Home सामाजिक गौरव शामकुळे 2025 युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित 

गौरव शामकुळे 2025 युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

1210

मुल : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने मुल येथे राष्ट्रीय पर्यावरण संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात देशभरातून संस्थेच्या प्रतिनिधीनी सहभाग नोंदवला होता. या संमेलनात स्वच्छता मित्र म्हणून प्रसिद्ध असलेले सामाजिक कार्यकर्ते गौरव शामकुळे आणि त्यांच्या सहकार्याचा 2025 युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवीण्यात आले.

.      नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था ही देशातील पर्यावरनावर काम करणारी मोठी संस्था असून सदर संस्थेच्या कार्याचा जाळा देशभर विखूरलेला आहे. अशा नामांकित संस्थेच्या वतीने गौरव शामकुळे आणि त्याच्या सहकार्यांनी गेल्या काही वर्षापासून मुल आणि आजूबाजूच्या परिसरात अविरतपणे सुरु असलेल्या स्वच्छतेच्या कार्याचा गौरव करीत संमेलनाला उपस्थित मान्यवर राज्याचे माजी कॅॅबिनेट मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 2025 युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याबद्दल गौरव शामकुळे आणि सहकार्याचा मित्रपरिवार आणि प्रतिष्ठित नागरिकांकडून कौतुक केल्या जात आहे.

error: Content is protected !!