चंदनसिंग चंदेल यांचे प्रतिपादन
बल्लारपूर येथे पत्रकार दिनी मान्यवरांचा सन्मान
विसापूर : आज समाजात पत्रकारांचा सन्मान आहे. त्यांच्याकडे आशेने पाहत आहे. तो समाजाचा एका प्रकारे आरसा आहे. पत्रकारांनी समाजाभिमुख लेखन करावे.समाजाला योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त करावे.यासाठी त्यांनी सामाजिक भान ठेवून कार्यप्रवण होण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपाचे जेष्ठ नेते चंदनसिंग चंदेल यांनी बल्लारपूर येथे केले.
. बल्लारपूर तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार तथा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचा कार्यक्रम संत तुकाराम महाराज सभागृह, बालाजी वार्ड बल्लारपूर येथे पार पडला. यावेळी सामाजिक, शिक्षण, कला, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भूमिपुत्र ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिलाषा गावतुरे, जेष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, डॉ. प्रा.विजय सोरते, भाजपाचे शहर अध्यक्ष काशिसिंग, प्रा. डॉ. सुधीर मोते, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना खेडकर, बल्लारपूर तालुका अध्यक्ष रमेश निषाद यांची उपस्थिती होती.
. वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करून कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले. दरम्यान दृष्टीहिन संघाचे संचालक सतीश शेंडे, प्रिया झांबरे, विभा पुणेकर, सोनू थोरात, राजू वानखेडे,पवनकुमार यादव आदींचा स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे उपस्थित मान्यवरांचा देखील पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्मृतिचिन्ह प्रदान करून सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन शांतीकुमार गिरमिल्ला यांनी केले. आभार प्रदर्शन योगीता पाटेकर यांनी केले. यावेळी समाज बांधवाची व शहरातील गणमान्य पत्रकारांची उपस्थिती होती.


