प्रथम धान विक्रेता शेतकरी यांचा सत्कार करून सन्मान
नेरी : आदिवासी विकास महामंडळ नाशिक उपप्रादेशिक कार्यालय चिमुर च्या मार्फतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. खांबाडा र.नं.८०५ या संस्थेमध्ये आधारभूत धान खरेदी केंद्राचे शुभारंभ दि 4 जाने संस्थेचे सभापती मंगेश धाडसे तसेच संचालक मंडळ यांचे हस्ते करण्यात आले.
. प्रथम धान उत्पादक शेतकरी तथा प्रथम संस्थेत धान्य विक्रेता प्रभुदास फकिरा गुरुनुले यांचा संस्थेच्या वतीने शाल,टोपी, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सभापती मंगेश धाडसे, उपसभापती शिवचरण गायकवाड, संस्थेचे संचालक दिलिप बावणे,सुभाष नन्नावरे, किशोर नन्नावरे, रुपचंद घोडमारे, ब्रम्हा सांदेकर, ईश्वर श्रीरामे, सुनिल कडवे, जयपाल डांगे, तुलाराम बारसागडे, जोसना दडमल, कल्पना सोनवाने तसेच संस्थेचे व्यवस्थापक विनोद बारसागडे, संदिप घोंगे लिपीक, हमाल प्रमुख दयाराम चौखे, प्रदिप ताजणे, प्रफुल दडमल, हिवराज मुंढरे व इतर शेतकरी उपस्थित होते.


