नेरी : प्रेम विवाहाला घरच्यांचा विरोध असल्याने प्रेमीयुगलांनी गावातीलच तंटामुक्त समितीकडे धाव घेतली. दरम्यान तंटामुक्त समितीने पुढाकार घेत दोघांच्याही संमतीने त्यांचे ग्राम पंचायत कार्यालय नेरी येथे लग्न लावून देत प्रेमीयुगलांना विवाह बंधनात बांधले.
. नेरी येथील शंतनू शांतीलाल राठोड या युवकाचे शिवनपायली येथील निराशा विनोद पर्वते या युवतीवर प्रेम जडले दोघेही प्रेमात आकंठ बुडाले आणि प्रेमाच्या आणाभाका घेऊन एकमेकांसोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मात्र घरातील लोकांचा या प्रेमाला विरोध असल्याने त्यांच्या प्रेमात अडथळा निर्माण झाला तेव्हा त्यांनी तमुस समिती मार्फत लग्न करायचे ठरवून नेरी येथील तमुस समितीला दोघांच्याही संमतीने लग्न लावून देण्यासाठी अर्ज दाखल केला तमुस समितीने या अर्जावर विचारविनिमय करून त्याचे सर्व कागदपत्रे तपासून तसेच वयाचे प्रमाणपत्र पाहून दि 4 जाने ला ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही प्रेमीयुगलांचे विवाह लावून दिले
. यावेळी तमुस चे पदाधिकारी गंगाबाई कामडी, सत्यभामा कामडी, रुस्तम पठाण, तमुस अध्यक्ष हरिदास चांदेकर, संजय नागदेवते, माणिक नगराळे, सुशोधन घोनमोडे, डॉ जगदीश पिसे, डॉ रमेश राऊत, दशरथ पिसे, चंद्रभान कामडी, पिंटू खाटीक, संदीप पिसे, पंकज पाकमोडे, पालाश हिंगे आदींसह तमुस व ग्रामपंचायत चे पदाधिकारी तसेच गावकरी उपस्थित होते.


