नेरी : आदिवासी माना जमात मंडळ तसेच विद्यार्थी संघटनेच्या वतीने दोन दिवसीय नागदिवाळी महोत्सवाचे नेरी येथील माना समाजाच्या नियोजित जागेवर आयोजन करण्यात आले होते, विविध कार्यक्रमांच्या आयोजनांनी मोठया उत्साहाने नागदिवाळी महोत्सव साजरा करण्यात आला.
. नागदिवाळी महोत्सवाला दि 28 ला मुठपुजा करून सुरवात करण्यात आली सर्व समाज बांधवांनी परिसर स्वच्छ करून पूजा अर्चा करून कार्यक्रमाला सुरवात केली प्रथम महिलांसाठी कार्यक्रम घेण्यात आले यात हळदीकुंकू तसेच मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले यानंतर रात्रौ ला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेऊन महोत्सवाची शोभा वाढवली.
. दि 29 ला सकाळी परिसर स्वच्छ करून माँ माणिकादेवी ची पालखी मिरवणूक संपुर्ण नेरी शहरातून काढण्यात आली या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी पारंपरिक आकर्षक वस्त्रे परिधान करून सर्वांची लक्ष वेधले होते तसेच महिलांनी आकर्षक वेशभूषा करून महोत्सवात रंगत आणली होती संपूर्ण गावातून माँ माणिकादेवी च्या जयघोषाने मिरवणूक नियोजन स्थळी आणून सांगता करण्यात आली. यानंतर लगेच सामाजिक मार्गदर्शन व प्रबोधनपर कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पतरुजी दडमल गुरुजी उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ गोपीचंद गजभे, माया ननावरे, दिगांबर जांभूळे गुरुजी, ईश्वर रदये मुख्याध्यापक लोक विद्यालय विलास श्रीरामे गुरुजी सरोज चौधरी,नानाजी दडमल मंचावर मान्यवर म्हणून उपस्थित होते सर्व मान्यवरांचे स्वागत करून सत्कार सोहळ्याला सुरवात करण्यात आली यात माना समाजातील सेवा निवृत्त कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला.
. या प्रसंगी मान्यवरांनी माना आदिम समाजातील सामाजिक शैक्षणिक आर्थिक समस्या वर प्रकाश टाकून शिक्षण महत्वाचे असून प्रगती कशी साधता येईल यावर प्रकाश टाकीत समाजाची व्हलीडीटी तसेच शासकीय कागदपत्रे बाबत मार्गदर्शन करीत त्या समस्या कश्या सुटतील यावर भाष्य मान्यवरांनी केले समाजातील सांस्कृतिक रीती रिवाज व परंपरा यावर सुद्धा प्रकाश टाकीत त्या जोपासण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशनी जीवतोडे ,प्रास्ताविक चौखे तर आभार दडमल यांनी केले या कार्यक्रमाच्या नियोजन व यशस्वीतेसाठी प्रकाश जांभुळे वैभव चौधरी प्रदीप दडमल अनिल चौधरी संजय वाघमारे मोरेश्वर श्रीरामे मनसाराम जीवतोडे यांनी परिश्रम घेतले महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली


