Home सामाजिक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिंदे यांच्याकडून स्वागत

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिंदे यांच्याकडून स्वागत

3

जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

वरोऱ्यातील ‘दबंग’ कार्यकाळाची आजही चर्चा

अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी सदिच्छा भेट घेऊन दिल्या शुभेच्छा

चंद्रपूर : जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (CDCC) अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या भेटीत शिंदे यांनी नोपानी यांचे पुष्पगुच्छ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा आणि ‘ग्रामगीता’ देऊन आदरपूर्वक स्वागत केले.

जुन्या स्नेहाचा आणि जिव्हाळ्याचा संगम
आयुष नोपानी यांनी चंद्रपूर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच रवींद्र शिंदे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. नोपानी हे यापूर्वी वरोरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून कार्यरत होते. त्या काळात रवींद्र शिंदे आणि त्यांचे अत्यंत स्नेहाचे व कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. प्रदीर्घ काळानंतरही नोपानी यांनी तोच जिव्हाळा आणि आपुलकी कायम जपल्याबद्दल शिंदे यांनी यावेळी विशेष समाधान व्यक्त केले.

‘दबंग’ कार्यशैलीचा जिल्ह्याला होणार फायदा
वरोरा येथील कार्यकाळात आयुष नोपानी यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि त्यांची ‘दबंग’ कार्यशैली आजही सर्वसामान्यांच्या चर्चेत आहे. त्यांच्या याच प्रदीर्घ अनुभवाचा आणि कडक शिस्तीचा फायदा चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नक्कीच होईल, असा विश्वास रवींद्र शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला.

प्रशासन आणि जनतेत समन्वय साधण्यावर भर
या भेटीदरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही चर्चा करण्यात आली. पोलीस प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील समन्वय अधिक दृढ करून जिल्ह्याची शांतता अबाधित राखण्यासाठी प्रशासन अधिक संवेदनशीलतेने काम करेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. नोपानी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली जिल्ह्याचा गुन्हेगारीवर वचक बसेल आणि सुव्यवस्थेचा स्तर उंचावेल, असे मतही शिंदे यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!