Home सामाजिक “जय श्रीराम”… बंगाल भगवामय !

“जय श्रीराम”… बंगाल भगवामय !

3

आसाम, बंगाल व पुद्दुचेरीतील विजय म्हणजे राष्ट्रवादाचा बुलंद जयघोष – आ. सुधीर मुनगंटीवार

जनतेने विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताच्या विचारांवर उमटवला विश्वासाचा शिक्का

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आनंद

चंद्रपूर : पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेला भव्य विजय म्हणजे जनतेने विकास, राष्ट्रवाद आणि सुशासनाच्या विचारांवर व्यक्त केलेला प्रचंड विश्वास आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

सांस्कृतिक अस्मितेचा विजय
“जय श्रीराम”च्या घोषणांनी दुमदुमलेल्या बंगालच्या भूमीने राष्ट्रहित, संस्कृती आणि विकासाच्या विचारांना दिलेला हा अभूतपूर्व कौल ऐतिहासिक आणि प्रेरणादायी असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. बंगालच्या भूमीत उमटलेला हा जयघोष केवळ निवडणुकीतील विजयाचा नाद नसून भारताच्या सांस्कृतिक अस्मिता, राष्ट्रभक्ती आणि लोकशाहीवरील अढळ विश्वासाचा उत्सव असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पारदर्शक प्रशासनाला जनतेचा पाठिंबा
जनतेने केवळ राजकीय परिवर्तनासाठी नव्हे, तर मजबूत नेतृत्व, पारदर्शक प्रशासन आणि राष्ट्रहिताच्या धोरणांना पाठिंबा देत हा विजय घडवून आणल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेले विकासकार्य, गरीब कल्याणाच्या योजना, राष्ट्रीय सुरक्षेबाबतची ठाम भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे भाजप सरकार, यामुळेच जनतेने पुन्हा एकदा कमळावर विश्वास व्यक्त केला आहे.

नेतृत्वाचे अभिनंदन
या ऐतिहासिक विजयाबद्दल आ. मुनगंटीवार यांनी देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांचे मनस्वी अभिनंदन केले. तसेच आसाम, पश्चिम बंगाल व पुद्दुचेरीच्या जागृत, राष्ट्रप्रेमी जनतेचेही त्यांनी आभार मानून शुभेच्छा दिल्या. हा विजय आगामी काळात देशाच्या प्रगतीला नवी ऊर्जा देणारा आणि राष्ट्रहिताच्या विचारांना अधिक बळकट करणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

error: Content is protected !!