Home सामाजिक प्रभू श्रीराम आमचा प्राण, अस्मिता आणि अभिमान – आ. सुधीर मुनगंटीवार

प्रभू श्रीराम आमचा प्राण, अस्मिता आणि अभिमान – आ. सुधीर मुनगंटीवार

141

आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर येथील गिरनार चौकात शोभायात्रेचे भव्य स्वागत

आ. मुनगंटीवार यांनी घेतला शोभायात्रेत सहभाग

आकर्षक ‘फायर शो’ने वेधले चंद्रपूरकरांचे लक्ष

श्री रामनामाच्या जयघोषाने दुमदुमले अवघे चंद्रपूर

श्रीरामनवमी निमित्त भक्ती, उत्साह आणि परंपरेचा संगम

चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्रीरामनवमीच्या पावन आणि मंगलमय दिवशी चंद्रपूर येथे आयोजित भव्य शोभायात्रेचे गिरनार चौक येथे स्वागत केले. यावेळी आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘प्रभू श्रीराम आमचा प्राण, अस्मिता आणि अभिमान आहेत, आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून आपले जीवन समृद्ध होईल.’

.      चंद्रपूर शहरात भक्तिमय वातावरणात झालेला हा सोहळा उत्साह आणि श्रद्धेचा प्रतीक ठरला. चंद्रपूरकर भक्तिरसात न्हाऊन निघाले. यावेळी झालेला ‘फायर शो’ संपूर्ण शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरला. रंगीबेरंगी रोषणाई, लक्षवेधक आतषबाजी आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात चंद्रपूरकर मोठ्या आनंदाने शोभायात्रेत जयघोष करत सहभागी झाले.

.      भाविकांच्या सेवेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तर्फे शीतपेयाचे वितरण करण्यात आले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सोय व्हावी, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून उत्सवाला धार्मिक अधिष्ठान दिले.

.      आकर्षक रोषणाई… श्रीराम नामाचा अखंड जयघोष… पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले चिमुकले… आणि अभूतपूर्व उत्साह या सर्वांच्या संगमामुळे अवघे चंद्रपूर शहर भक्तीरसात तल्लीन झाले होते. ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता, तर शहरातील प्रमुख मार्गांवर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. ही शोभायात्रा चंद्रपूरकरांसाठी खऱ्या अर्थाने भक्तीमय मेजवानी ठरली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही शोभायात्रेत सहभागी होत उत्सवात रंग भरला.

.      चंद्रपूर शहरात श्रीरामनवमी शोभायात्रेची अनेक वर्षांची परंपरा असून यंदाही श्रीराम नवमी विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शोभायात्रेत अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग, चिमुकल्यांनी साकारलेल्या श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या वेशभूषा, चौकाचौकात घुमणारे जयघोष आणि भव्य आतषबाजी यामुळे शहराचे वातावरण दणाणून गेले होते.

मिरवणुकीदरम्यान ‘भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा’, ‘राम जी की निकली सवारी’, ‘आज राम आएंगे’ यांसारख्या भक्तिगीतांच्या तालावर तरुणाई बेधुंद नाचताना दिसत होती. विविध ठिकाणी उभारण्यात आलेले देखावे, ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण आणि केशरी विद्युत रोषणाईच्या पार्श्वभूमीवर रंगणारी आतषबाजी यामुळे संपूर्ण शहर चैतन्यमय झाले होते.

‘सियावर रामचंद्र की जय’, ‘प्रभू श्रीराम की जय’, ‘श्रीरामचंद्रांचा जयजयकार’ अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महापौर संगीता खांडेकर, महानगराचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, महामंत्री डॉ मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, नम्रता ठेमस्कर, रामपाल सिंग, सुरज पेदूलवार, डॉ. शैलेंद्र शुक्ला, चांद सैय्यद, नगरसेवक प्रज्वलंत कडू, रवी लोणकर, सुनीता जयस्वाल, सविता सरकार, जयश्री जुमडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते.

.      आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत अनेक नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेत उत्सवाच्या आठवणी जपल्या. भक्ती, परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम घडवत चंद्रपूर शहरात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने साजरा करण्यात आली.

error: Content is protected !!