Home सामाजिक रोटरी क्लब वरोराचा स्तुत्य उपक्रम

रोटरी क्लब वरोराचा स्तुत्य उपक्रम

155

पानपोईसह चप्पल व सुती दुपट्टा वाटप केंद्राचे उद्घाटन

कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदतीचा हात

नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

वरोरा : वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता, रोटरी क्लब वरोराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शहरात ‘पानपोई’ तसेच गरजू नागरिकांसाठी ‘सुती दुपट्टा व चप्पल वितरण’ केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे. या केंद्राचे भव्य उद्घाटन बुधवार, २५ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडले.

.     वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते या सेवा केंद्राचे फित कापून लोकार्पण करण्यात आले. उन्हाळ्याच्या दिवसांत सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी आणि अनवाणी चालणाऱ्या गोरगरिबांना ऊन्हापासून संरक्षण मिळावे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.

.      याप्रसंगी रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष योगेश डोंगरवार, एजी अमित लाहोटी, प्रोजेक्ट हेड चेतन शर्मा यांच्यासह अमित नाहर, अभिजित मणियार, विशाल जाजू, अभिजित बोथले, अदनान सद्दीकोट, राम लोया, पियुष गुंडावार, विक्की आगलावे व इतर मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!