Home सामाजिक भद्रावतीत जागतिक ग्राहक दिन उत्साहात

भद्रावतीत जागतिक ग्राहक दिन उत्साहात

212

ग्राहक हक्क आणि ऑनलाईन व्यवहाराबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन

ग्राहक पंचायत महाराष्ट्र व तहसील कार्यालय भद्रावती यांचा संयुक्त उपक्रम

जनजागृती रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भद्रावती : जिल्हा परिषद तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, भद्रावती येथे ‘जागतिक ग्राहक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र (शाखा भद्रावती) आणि तहसील कार्यालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक हक्क, जबाबदाऱ्या आणि ग्राहक संरक्षणाबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली.

.      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी बंडू आकनुरवार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका गावंडे, निरीक्षण अधिकारी हर्षा दुधे, पुरवठा निरीक्षक वैभव सोळंके, रती मस्के, केंद्रप्रमुख मोरेश्वर विद्ये, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे तालुकाध्यक्ष प्रविण चिमुरकर, सचिव वतन लोणे, तसेच बालाजी दांडेकर, बाळा कुटेमाटे, रामचंद्र दिगदैतुलवार आणि विकास दुर्योधन यांची प्रमुख उपस्थिती होती.

.      याप्रसंगी मार्गदर्शन करताना तहसीलदार राजेश भांडारकर म्हणाले की, “आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना ग्राहकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी आपले अधिकार जाणून घेणे ही काळाची गरज आहे.” प्रमुख पाहुणे बंडू आकनुरवार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना ‘जागरूक ग्राहक’ बनण्याचे आवाहन केले.

.      कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी काढलेली ‘ग्राहक जनजागृती रॅली’. हातामध्ये ग्राहक हक्कांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढली. ही रॅली नगरपरिषद आवारात पोहोचताच नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे स्वागत केले.

.      कार्यक्रमाचे संचालन विनोद ठमके यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार सोनल वावरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत खोब्रागडे, करूणा मोघे, प्रतिक्षा बनकर, गुरूदेव बावणे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक हक्कांप्रती मोठी जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले.

error: Content is protected !!