Home सामाजिक “महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये, त्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देणार”...

“महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये, त्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देणार” – खासदार प्रतिभा धानोरकर

204

महिला क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी खासदारांचे प्रतिपादन

चंद्रपुरातील महिलांच्या क्रीडा कौशल्याचे केले कौतुक

चंद्रपूर : “आजच्या काळात स्त्रिया केवळ चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. आपल्या परिसरातील महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे, फक्त त्यांना योग्य संधी आणि हक्काचे व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये, याच उद्देशाने आगामी काळात क्रिकेटसह इतर सर्वच क्षेत्रांत त्यांना पुढे येण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित भव्य महिला क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या.

.       यावेळी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष कुंदा जेणेकर, काँग्रेस प्रदेश महासचिव तथा नगरसेविका सुनंदा धोबे, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेविका संगीता भोयर, नगरसेविका वैशाली महाडोळे, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेवक रामनरेश यादव, प्रोफेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, दिलीप वावरे, गौतम नागदेवते, सेवादल युथ ब्रिगेट जिल्हाध्यक्ष सौरभ ठोंबरे, काँग्रेस नेते शामकांत थेरे, प्रवीण काकडे, राहुल तायडे, अतुल वाघमारे, नम्रता वावरे, अश्विनी खोब्रागडे, सुवर्णा लोखंडे, दीक्षा सातपुते, शालिनी भगत, छोटू सोमलवार, स्वप्नील कांबळे, राज यादव, संजय घागी, यश दत्तात्रय, मनीष दास, मोनू रामटेके, यांची उपस्थिती होती.

.       या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि चषकासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सांघिक यशासोबतच वैयक्तिक नैपुण्य गाजवणाऱ्या खेळाडूंनाही आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यामध्ये अनुष्का कल्लेपल्ली (आझाद गार्डन) ही ‘बेस्ट बॅट्समन’, अश्विनी जाधव (CMC) ही ‘बेस्ट बॉलर’ आणि श्वेता आईचवर (आझाद गार्डन) ही ‘बेस्ट फिल्डर’ ठरली. तसेच साधना प्रजापती (इरई संघ) हिला ‘वुमन ऑफ द सिरीज’चा बहुमान मिळाला. विजेत्यांना ड्रेसिंग टेबल, कुलर आणि डिनर सेट यांसारखी आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

.       यावेळी खेळाडूंना संबोधित करताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये, आज स्त्रिया चूल आणि मूल या पलीकडे जाऊन उत्तम काम करत आहेत. आपल्या परिसरातील महिलाही कुठेच कमी नाहीत, मात्र त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. आगामी काळात महिलांसाठी मोठ्या क्रिकेट स्पर्धांसह इतर क्षेत्रांतही त्यांना पुढे येण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.” स्पर्धेच्या यशस्वीतेबद्दल आयोजक मराठा चॅरिटेबल ट्रस्ट व जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!