Home सामाजिक नंदोरी येथे क्रांतीसूर्य वीर बाबूराव शेडमाके यांची १९३ वी जयंती उत्साहात साजरी

नंदोरी येथे क्रांतीसूर्य वीर बाबूराव शेडमाके यांची १९३ वी जयंती उत्साहात साजरी

224

आदिवासी जननायक वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मृतीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन

भद्रावती : तालुक्यातील नंदोरी येथे आदिवासींचे आराध्य दैवत आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार क्रांतीकारक वीर बाबूराव शेडमाके यांची १९३ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली.

.      कार्यक्रमाच्या प्रारंभी वीर बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी बाबूराव शेडमाके यांच्या देदीप्यमान जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान आणि इंग्रजांविरुद्ध पुकारलेला लढा आजही प्रेरणादायी असून, त्यांचा हा पराक्रमाचा वारसा नवीन पिढीने पुढे न्यावा, असा सूर यावेळी उमटला.

.      या जयंती उत्सवासाठी गावातील प्रमुख नागरिक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यात प्रामुख्याने बलवंत अत्राम, अमोल पुसनाके, उमेश अत्राम, अजीत पुसनाके, सतीश येटे, अंकित पुसनाके, सुदर्शन अत्राम, सतीश लांबट, साहिल ढवस यांच्यासह अनेक समाजबांधवांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!