Home चंद्रपुर जिल्हा विशेष गॅस दरवाढ आणि तुटवड्याविरोधात बल्लारपुरात काँग्रेसचा एल्गार

गॅस दरवाढ आणि तुटवड्याविरोधात बल्लारपुरात काँग्रेसचा एल्गार

459

तहसीलदारांना निवेदन सादर

केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आक्रोश मोर्चा

सामान्य जनतेच्या प्रश्नावर धरणे आंदोलन

बल्लारपूर : केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड महागाईचा सामना करावा लागत आहे. आधीच महागाईने होरपळलेल्या जनतेवर आता गॅस सिलेंडरची दरवाढ आणि कृत्रिम तुटवडा लादून सरकारने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसने केली आहे. या दरवाढ आणि तुटवड्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. १२) बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन आणि आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

.       यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गॅस दरवाढ तात्काळ कमी करण्याची आणि सिलेंडरचा तुटवडा दूर करण्याची मागणी केली. आंदोलनानंतर तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्यामार्फत केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

.       या आंदोलनात नगराध्यक्ष डॉ. अलका वाढई, ज्येष्ठ नेत्या डॉ. रजनी हजारे, शहर अध्यक्ष अब्दुल करीम, तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, महिला काँग्रेस अध्यक्ष अफसाना सय्यद आणि युवक काँग्रेस अध्यक्ष नरेश गंडपल्ली यांनी नेतृत्त्व केले.

.       आंदोलनात दिलीप माकोडे, सुनंदा आत्राम, छाया मडावी, डॉ. सुनील कुल्दीवार, डॉ. अनिल वाढई, नासिर खान, भास्कर माकोडे, नगरसेवक करुणा रेब्बावार, वैशाली हुमने, अंकुबाई बुक्या, प्रियंका थुलकर, वैष्णवी जुमडे, शिल्पा चुटे यांच्यासह भारत थुलकर, दिपक धोपटे, नरसिंग रेब्बावार, अनिल खरतड, डेव्हिड कामपेल्ली, डॉ. युवराज भसारकर, महमुद पठाण, प्रितम पाटील, अजय दुपारे, हेमंत मानकर, वासुदेव येरगुडे, शंकर आलाम, राजू मेश्राम, वर्षा दानव, साबिर शेख, फारूख शेख, नौशाद शेख, हरीश पवार, अजित पडवेकर, शंकर माने आणि शेकडो काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!