Home सामाजिक चंद्रपूर जिल्हा होणार १०० टक्के पाणंद रस्ते पूर्ण करणारा पहिला जिल्हा

चंद्रपूर जिल्हा होणार १०० टक्के पाणंद रस्ते पूर्ण करणारा पहिला जिल्हा

236

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले प्रशासनाला उद्दिष्ट 

पुढील तीन वर्षांत मतदारसंघातील सर्व कामे पूर्ण करण्याचे आ. मुनगंटीवार यांचे निर्देश

कामांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करणार

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठक

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पाणंद रस्त्यांची १०० टक्के पूर्तता करणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरावा, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध काम करावे, असे स्पष्ट निर्देश माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

.      आमदार मुनगंटीवार यांनी नियोजनबद्ध काम करून पुढील तीन वर्षांच्या आत मतदारसंघातील सर्व पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देशही उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

.      आ. मुनगंटीवार यांनी पाणंद रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. कोणती कामे झाली आहेत, कोणती प्रलंबित आहेत यासंदर्भात माहिती घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांना पुढील तीन वर्षांचे उद्दिष्ट दिले. हे काम करताना पाणंद रस्त्यांच्या कामांचे नियोजन, प्रगती व देखरेख सुलभ व्हावी म्हणून स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करण्याचे तसेच पाणंद रस्त्यांच्या बांधकामासाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देशही आ. मुनगंटीवार यांनी दिले.

.      याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान (टप्पा 1) अंतर्गत सर्वसामान्य व गोरगरीब  नागरिकांच्या विविध समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या सूचनादेखील आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. नागरिकांना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देऊन प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत तसेच हे अभियान प्रभावीपणे राबवून यशस्वी करावे, असे निर्देशही आ. मुनगंटीवार यांनी दिले.

error: Content is protected !!