Home सामाजिक लोकमान्य महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

लोकमान्य महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

294

कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी विज्ञान साहित्य’ विषयावर व्याख्यान

वरोरा : लोकमान्य महाविद्यालयात दि. २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. जयश्री शास्त्री होत्या, तर प्रमुख वक्त्या म्हणून मराठी विभागाच्या प्रा. डॉ. रजनीगंधा खिरटकर उपस्थित होत्या.

.     कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन आणि सरस्वती स्तवनाने झाली. या प्रसंगी विद्यार्थिनींनी ‘मराठी भाषा गौरव गीत’ सादर केले. प्रमुख वक्त्या डॉ. खिरटकर यांनी ‘मराठी विज्ञान साहित्य’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री यांनी कुसुमाग्रजांच्या जीवनकार्याचा वेध घेत विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले.

.     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चेतना पवार यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. अर्चना भोगेकर यांनी मांडले. शेवटी प्रा. मेघा लाकडे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!