Home सामाजिक विसापूर ग्रामपंचायत तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

विसापूर ग्रामपंचायत तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

302

बल्लारपूर : हिंदवी स्वराज्याचा पाया रचून लोककल्याणकारी राज्य निर्माण करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत कार्यालय मध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराजांच्या प्रतिमेला मालार्पण व दीपप्रज्वलन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

.        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटणकर, शारदा डाहुले, रिना कांबळे, वैशाली पुणेकर, ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे, लिपिक संतोष निपुंगे, राहूल टोंगे, अशोक ठुणेकर, सुरज डबरे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन केले.

error: Content is protected !!