माजी उपसरपंच विठ्ठल हनवते यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन
युवकांचा मोठा सहभाग
भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथील माधवराव महाराज चौक येथे आज गुरुवार १९ फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि युवकांच्या मोठ्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
. कार्यक्रमाची सुरुवात माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल रामकृष्ण हनवते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा केला.
. या सोहळ्याला महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समीर खान पठाण, कृषी सहायक पंकज सोनटक्के, सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर दोडके, प्रमोद कोसुरकार, लोकेश कोकुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल कोकुडे आणि गायकवाड सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बंडु दडमल, वसंता भरडे, अमर बागेसर, सिंगलदिप पेंदाम, हुशेन शेख, प्रज्वल बोढे, क्रिश कोसुरकार, अमोल महागमकार, क्रिष्णा नन्नावरे, भारत कोकुडे, स्वप्निल दडमल, रोशन श्रिरसागर यांसह माजी ग्रामपंचायत सदस्या अमृता कोकुडे, लता नन्नावरे, आषा कोकुडे, निराषा नन्नावरे, सुनिता कोसुरकार, कल्पना कोसुरकार, ओंमकार राखुंडे, पावणी कोकुडे, सक्षम निकोडे उपस्थित होते.
. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शौर्य क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आशिष हनवते, राहुल कोसुरकार, मंगेश हनवते, शंकर दडमल, देवानंद दोडके, निखिल दोडके आदींनी परिश्रम घेतले.


