Home सामाजिक आमदार सुधीर मुनगंटीवारांची संवेदनशीलता

आमदार सुधीर मुनगंटीवारांची संवेदनशीलता

319

अपघातात आई गमावलेल्या कुटुंबाला १० लाखांची तातडीची मदत

बामणी जवळील भीषण अपघातात नीलिमा रोहनकर यांचा मृत्यू

सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकाराने लॉयड्स मेटल्सकडून मदतीचा हात

चंद्रपूर : राज्याचे माजी मंत्री आणि चंद्रपूरचे कार्यसम्राट आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा चंद्रपूरकरांना आला आहे. एका भीषण रस्ते अपघातात आपल्या घरातील आधारस्तंभ गमावलेल्या रोहनकर कुटुंबाच्या पाठीशी मुनगंटीवार खंबीरपणे उभे राहिले असून, त्यांच्या तत्परतेमुळे या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने मिळवून देण्यात आली आहे.

नेमकी घटना काय ?
गोंडपिपरी येथील एका वास्तू कार्यक्रमावरून परत येत असताना बल्लारपूर जवळील बामणी येथे नीलिमा देवराव रोहनकर (रा. छोटा बाजार, चंद्रपूर) यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या दुर्दैवी अपघातात नीलिमा रोहनकर यांचा मृत्यू झाला. एका सामान्य कुटुंबातील आईचे छत्र हरवल्याने रोहनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

मुनगंटीवारांचा ‘अ‍ॅक्शन मोड’
या घटनेची माहिती प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक रवी लोणकर यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून मुनगंटीवार यांनी क्षणभरही विलंब न लावता लॉयड्स मेटल्स कंपनीचे सिनियर जनरल मॅनेजर अमित जयसिंग यांच्याशी संपर्क साधला. पीडित कुटुंबाची परिस्थिती पाहता त्यांना तातडीने कंपनीच्या माध्यमातून सीएसआर (CSR) फंडातून किंवा मदतीच्या स्वरूपात आर्थिक पाठबळ देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विश्रामगृहात सांत्वन आणि धनादेश सुपूर्द
चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात आमदार मुनगंटीवार यांनी मृतक नीलिमा रोहनकर यांचे पती देवराव रोहनकर आणि मुलगी निरुपा यांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन करताना मुनगंटीवार भावूक झाले होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे लॉयड्स मेटल्सकडून मंजूर झालेला १० लाख रुपयांचा धनादेश यावेळी कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला.

काय म्हणाले मुनगंटीवार ?
“हा आर्थिक आधार त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची जागा कधीच भरून काढू शकत नाही, मात्र या कठीण काळात समाज आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या सोबत आहोत, ही भावना देणे महत्त्वाचे आहे. रोहनकर कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो,” अशी प्रार्थना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

.        एका लोकप्रतिनिधीने केवळ घोषणा न करता, प्रत्यक्ष मैदानात उतरून पीडित कुटुंबाला काही तासांतच मदत मिळवून दिल्याने सर्वत्र सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!