Home सामाजिक नंदोरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

नंदोरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

383

राष्ट्रीय खेळाडू राशी मांडवकरचा विशेष सत्कार

संत गमाजी महाराज संस्थेचा उपक्रम

स्व. सेनाजी मांडवकर गुरुजींच्या स्मृतीला उजाळा

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी (बु.) येथील संत गमाजी महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर यांच्या संकल्पनेतून, स्व. सेनाजी मांडवकर गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २७ जानेवारी २०२६ रोजी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.

.         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष धनराज विरुटकर होते. याप्रसंगी सरपंच मंगेश भोयर, उपसरपंच उषा लांबट, नरेंद्र जिवतोडे, अंबर जिवतोडे, किशोर उमरे, शा.व्य.स. अध्यक्ष घनश्याम ढवस, गोपालकृष्ण मांडवकर, रवी खाडे, विनोद लांबट, प्रभाकर मांडवकर आणि मुख्याध्यापक विजय सातपुते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

.          या सोहळ्यात जि.प. शाळेची माजी विद्यार्थिनी राशी मांडवकर हिची राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघात निवड झाल्याबद्दल तिचा आणि तिचे प्रशिक्षक सुनील बांगडे व गजानन जिवतोडे (लोकमान्य क्रीडा अकादमी, वरोरा) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

.           जि.प. उच्च प्राथमिक शाळा, नंदोरी (बु.) येथे आयोजित या कार्यक्रमात इयत्ता १ ली ते ७ वी मधील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह, शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देऊन गौरविण्यात आले. भंडारा येथील पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर यांनी आपल्या मूळ गावाची नाळ कायम राखत राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी व शाळेने त्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!