Home सामाजिक लोकप्रतिनिधी कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुनगंटीवार – विजय दर्डा

लोकप्रतिनिधी कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुनगंटीवार – विजय दर्डा

623

पत्राची दखल अन् थेट फोनवरून संवाद

माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केला गौरवपूर्ण अभिमान

चंद्रपूर : “लोकप्रतिनिधी कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार. जनतेचे प्रश्न ऐकणे, ते समजून घेणे आणि तातडीने सोडवणे ही त्यांची कार्यपद्धती कौतुकास्पद आहे,” अशा शब्दांत लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीचा गौरव केला आहे.

प्रत्येक पत्राची दखल अन् थेट संवाद
विजय दर्डा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सुधीरभाऊंकडे कोणताही विषय किंवा पत्र गेले की, त्याची दखल ते आवर्जून घेतात. आजच्या काळात फोनला प्रतिसाद मिळणे कठीण असते, मात्र सुधीरभाऊ केवळ पत्राची दखल घेत नाहीत, तर स्वतः फोन करून संबंधित व्यक्तीशी संवाद साधतात आणि तो विषय मार्गी लावतात. हीच त्यांच्या जनसंपर्काची मोठी ताकद आहे.

अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व
राज्याचा अर्थसंकल्प यशस्वीपणे सांभाळल्यामुळे सुधीरभाऊंना प्रत्येक विभागाची बारीक-सारीक माहिती आहे. त्यांचा दृष्टिकोन नेहमीच अभ्यासू असतो. ते केवळ लोकप्रतिनिधी नाहीत, तर खऱ्या अर्थाने जनतेशी नाळ जोडलेले नेते आहेत. त्यांच्या कामाची पद्धत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी शिकण्यासारखी आहे, असेही दर्डा यांनी नमूद केले.

चंद्रपूर जिल्हा भाग्यवान
“चंद्रपूर जिल्ह्याला सुधीरभाऊंसारखा कर्तृत्ववान आणि संवेदनशील लोकप्रतिनिधी लाभला आहे, हे जिल्ह्याचे भाग्य आहे,” अशा शब्दांत दर्डा यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘सुधीरभाऊ.. Proud of You. Love You..!’ या शब्दांत त्यांनी मुनगंटीवार यांच्याप्रती आपला स्नेह व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!