Home सामाजिक बामणी (दुधोली) येथील भजन स्पर्धेतून राष्ट्रसंतांच्या विचाराची पेरणी

बामणी (दुधोली) येथील भजन स्पर्धेतून राष्ट्रसंतांच्या विचाराची पेरणी

360

विदर्भस्तरीय भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जय श्रीराम पदावली भजन मंडळाचे आयोजन

बल्लारपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजेरीच्या माध्यमातून भजन,कीर्तनातून स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. यामुळे समाजमनावर चांगला परिणाम झाला. त्यांच्या कार्याचा प्रसार व प्रचार आजही केला जात आहे. याची प्रेरणा अमरावती येथील गुरूकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आश्रमातून मिळाली आहे. बल्लारपूर तालुक्यातील बामणी (दुधोली) येथील जय श्रीराम पदावली भजन मंडळ (नोंदणी क्रमांक – ९५२५/२0२५) मागील आठ वर्षापासून विदर्भस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या भजन स्पर्धेतून राष्ट्रसंतांच्या विचारांची पेरणी करण्याचा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

.        बल्लारपूर तालुक्यातील बामणी (दुधोली) येथे हनुमान मंदिराच्या प्रांगणात दि. १६ ते दि. १८ जानेवारी दरम्यान विदर्भस्तरीय भजन स्पर्धा उपसरपंच सुभाष ताजने यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महिला व पुरुष गटात ग्रामीण तथा शहर गटात आणि बाल गट अशा पाच गटात घेण्यात आली. यासाठी जय श्रीराम पदावली भजन मंडळ व गावकऱ्यांचा लोकसहभाग महत्वाचा घटक ठरला. या पाचही गटातील भजन स्पर्धेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचा विचारांची स्पर्धकांनी पेरणी केली. उत्स्फूर्त प्रतिसाद व उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. भजन स्पर्धेत भाग घेणाऱ्या भजन मंडळाच्या व गुरुदेव भक्तांचे आदरातिथ्य सुखावणारे ठरले.

.       भजन संमेलनाचे उदघाटन चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी बामणी (दुधोली) चे सरपंच प्रल्हाद आलाम होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सुभाष ताजने, बल्लारपूरच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अलका वाढई, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश खडके, मोहनदास मेश्राम, मारोती सातपुते, लोमेश मडावी यांची उपस्थिती होती. यावेळी जय श्रीराम भजन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांच्या वतीने डॉ. अलका अनिल वाढई यांचा भावपूर्ण सत्कार केला.

.      विशेष म्हणजे पाचही गटातील भजन स्पर्धेसाठी विदर्भातील सहा जिल्ह्यातील जवळपास ५५ भजन मंडळाच्या गुरुदेव भक्तांनी गायनातून राष्ट्रसंतांच्या विचारांची शिदोरी दिली. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासाठी शेख जमील, श्रीहरी अंचूर, संजय गोंधळी, नरेश उईके, संतोष मडावी, दिपाली कोटनाके, वर्षा आलाम, सरला जुआरे, विजया मडावी, सुजाता दुपारे, कविता खामनकर, गिता वाघाडे,माजी सरपंच कमलाबाई कोडापे,नलिनी साळवे,सुरेखा निब्रड,ज्ञानेश्वर काटोले,रवि रणदिवे,गणेश झाडे,सत्यशिला साळवे,रमेश राजुरकर,धनराज वरारकर,डॉ. नत्थू साळवे यांच्यासह गावकऱ्यांचे सहकार्य मिळाले.

error: Content is protected !!