Home सामाजिक वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील औद्योगिक कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगाराची संधी द्या

वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील औद्योगिक कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगाराची संधी द्या

391

मुकेश जिवतोडे यांनी उद्योगमंत्र्यांना दिले निवेदन

चंद्रपूर : वरोरा आणि भद्रावती विधानसभा क्षेत्रातील औद्योगिक कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सुटाव्यात, या मागणीसाठी शिवसेनेचे (शिंदे गट) चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.

.       या निवेदनाद्वारे जिवतोडे यांनी श्री सिमेंट कंपनी, केपीसीएल कंपनी, निप्पॉन डेंड्रो, एकोणा खदान आणि माजरी खदान यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमधील प्रलंबित प्रश्न उद्योगमंत्र्यांसमोर मांडले. वरोरा-भद्रावती क्षेत्रातील स्थानिक बेरोजगार युवकांना या कंपन्यांमध्ये प्राधान्याने नोकरी मिळावी, ही मुख्य मागणी त्यांनी केली. सोबतच, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळणे, वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आणि परिसरातील विकासात्मक कामे मार्गी लावण्याची आग्रही विनंती केली.

.       मुकेश जिवतोडे यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने एक विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्थानिक युवकांना न्याय देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

error: Content is protected !!