पुष्पा गिरडकर यांचे प्रतिपादन
विसापुरात समाजातील गुणवंतांचा सत्कार
बल्लारपूर : श्री. संत शिरोमणी जगनाडे महाराज यांनी आपल्या वाणीतून चांगले विचार मांडले. म्हणून ते समाजरत्न ठरतात.त्यांचे कार्य समाजाला न्याय देणारे आहे.आजही श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची शिकवण समाजाला प्रेरणादायी ठरत आहे, असे प्रतिपादन सेवा निवृत्त शिक्षक पुष्पा गिरडकर यांनी विसापूर येथे केले.
. विसापूर येथील तेली समाजाच्या वतीने स्थानिक श्री पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयात श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती प्रित्यर्थ महिला मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उदघाटन सिमा हरणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मार्गदर्शक म्हणून पुष्पा गिरडकर, सुरेखा ईटनकर, मोनिका शेंडे, मनिषा ढेंगरे, शोभा घिवे, मनिषा गिरडकर, कविता बावणे यांची उपस्थिती होती.
. तत्पूर्वी समाज बांधवांनी श्री. संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्र प्रतिमेसह मिरवणूक काढून गावातील संत व महापुरुषांच्या पुतळ्यांना मालार्पण करून अभिवादन केले. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्या व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या मुख्य समारंभाच्या अध्यक्षस्थानी तेली समाज मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र ईटनकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर येथील माजी नगराध्यक्ष डॉ. मधुकर बावणे, सत्कारमूर्ती डॉ. आशिष बावणे, डॉ. पुजा गिरडकर, दिनकर गिरडकर, अक्षय देशमुख, नंदकिशोर गिरडकर, गजानन पाटणकर, राहूल बुटले, संतोष वैरागडे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. पुजा गिरडकर व डॉ. आशिष बावणे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा देखील गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय देशमुख, संचालन सुरेश ईटनकर, तर आभार प्रदर्शन विठ्ठल साखरकर यांनी केले. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.


