Home सामाजिक नंदोरीत सद्गुरू जगन्नाथ महाराज यांचा वार्षिक काला

नंदोरीत सद्गुरू जगन्नाथ महाराज यांचा वार्षिक काला

458

दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपुर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी बु येथे विदेही सद्गुरू श्री. जगन्नाथ बाबा संस्थानच्या वतीने आयोजित सद्गुरू जगन्नाथ महाराज यांच्या वार्षिक काल्यानिमित्त 14 ते 16 डिसेंबर 2025 दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

.       रविवार दि 14 ला सकाळी 6 वाजता परिसर स्वच्छता, स. 8.30 वा. घटस्थापना बंडू भोयर यांच्या हस्ते, दुपारी 12 ते 3 भजन वक्रतुंड महिला भजन मंडळ वरोरा, दू. 4 ते 6 धनराज विरुटकर यांचे अध्याय वाचन, सायं 6 ते 8 वा. ह.भ.प. पांडुरंग महाराज लांबट यांचा हरीपाठ, रात्री 9 ते 12 गुरुदेव वारकरी भजन मंडळ नंदोरी बु यांचा भजन तर सोमवार दि. 15 डिसेंबर ला सकाळी 7 वा. विवेक एकरे यांच्या हस्ते काकड आरती, दू 12 ते 3 राम चरित्र मानस भजन मंडळ नंदोरी खुर्द यांचा भजन, रात्रो 8 ते 10 प्रगती महिला भजन मंडळ नंदोरी बु यांचा भजन, रात्रो 10 ते 12 गुरुदेव वारकरी भजन मंडळ नंदोरी बु यांचा भजन होणार आहे. मंगळवार दि. 16 ला सकाळी 8 ते 11 हनुमान वारकरी भजन मंडळ नंदोरी बु यांचे भजन, स. 8 वा.

.         या पालखी सोहळ्याला उद्घाटक म्हणून लघु उद्योजक रमेश राजुरकर, शिवसेना चंद्रपुर वणी आर्णी लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे राहणार तर अध्यक्षस्थानी रंगनाथ स्वामी पतसंस्था शाखा वरोरा चे संचालक परीक्षित एकरे हे राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपुर चे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, ग्राम पंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, उपसरपंच उषा लांबट, ग्राम पंचायत भटाळी चे सरपंच सुधाकर रोहणकर, दैनिक नवजीवन चंद्रपुर चे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, माजी सरपंच शरद खामनकर, ग्राम पंचायत सदस्य किशोर उमरे, जिल्हा परिषद शाळा समिती नंदोरी चे अध्यक्ष घनश्याम ढवस, कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती चे उपसभापती अश्लेषा भोयर व समस्त नंदोरी वासी उपस्थित राहणार आहे.

.        सकाळी 11 ते 2.30 वा. ह.भ.प. खिरटकर महाराज यांचे किर्तन, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर चे अध्यक्ष रविंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते चंदू वासाडे, गुरुकुंज आश्रम मोजरी चे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, सामाजिक कार्यकर्ते अंबर अशोक जिवतोडे, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल श्री. रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपुर चे अध्यक्ष धनराज आस्वले राहणार आहे.

.       सद्गुरू सोनामता व संत अंकुश महाराज यांच्या हस्ते गोपाल काला या नंतर लगेच दहीहंडी व महाप्रसाद होणार आहे. या महाप्रसादाचा आस्वाद सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री. जगन्नाथ बाबा देवस्थान कमेटी तथा समस्त ग्राम वासीयांनी केले आहे.

error: Content is protected !!