Home राजकीय बल्लारपुरात कांग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी मतदार राजा एकवटल्याचे चित्र

बल्लारपुरात कांग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी मतदार राजा एकवटल्याचे चित्र

669

जाहीर सभेनंतर समर्थकांत उत्साह संचारला

बल्लारपूर शहर विकास आघाडी व संभाजी ब्रिगेडचे समर्थन

बल्लारपूर : बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शहरात स्वच्छ व सुंदर शहर, प्रत्येक प्रभागात मुलभूत सुविधा, आरोग्य व शिक्षणाची सुविधा, सुशासन आधारित गतीमान प्रशासन व रोजगाराभिमुख अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प करून नगराध्यक्ष पदासाठी अलका अनील वाढई व 32 नगरसेवक शिलेदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. या शिलेदारांच्या प्रचारार्थ कांग्रेस विधीमंडळ गट नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, संतोषसिंग रावत यांची धडाकेबाज प्रचार सभा बल्लारपूर शहरात गुरूवारी झाली. यामुळे कांग्रेसच्या समर्थकांत उत्साह संचारला आहे. आता शहरातील मतदार कांग्रेसच्या शिलेदारांच्या विजयासाठी एकवटल्याचे चित्र दिसून येत आहे.

.       बल्लारपूर नगरपालिका निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना येथील शहर विकास आघाडी व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याने कांग्रेसच्या उमेदवारांना पाठबळ मिळाले आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अलका वाढई व त्यांचे पती डॉ. अनील वाढई, त्याचप्रमाणे प्रभागातील उमेदवार लवाजम्यासह मतदारांच्या भेटीला जात आहे. येथील कांग्रेसची धुरा शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी अध्यक्ष अब्दुल करीम, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, माजी न. प. उपाध्यक्ष डॉ. सुनील कुल्दीवार यांनी घेतली असून प्रभाग एक पासून सतरा पर्यंतच्या मतदारांच्या पसंतीला उतरण्यासाठी व कांग्रेसच्या पदरात मते पडावी, म्हणून प्रयत्न करत आहे.

.         विशेष म्हणजे शुक्रवारी शहरातील तीन एक्का गेट परिसर, गोकुलनगर वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, जयभीम चौक परिसर, मौलाना आझाद वार्ड, डॉ. राजेंद्र प्रसाद ,कन्नमवार वार्ड कांग्रेसच्या उमेदवारांनी पिंजून काढल्याने मतदारांचे समर्थन वाढत आहे. कधी नव्हे, ते या निवडणुकीत कांग्रेस पक्षाच्या शिलेदारांच्या विजयासाठी शहरातील प्रत्येक प्रभागातील मतदार एकवटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरीही मतपेटीतूनच उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला बाहेर पडणार आहे.
येथील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका वाढई, नगरसेवक पदाचे उमेदवार छाया मडावी, शिवबचन राजभर, निशीकांत खैरे, वैष्णवी जुमडे, ॲड. पवन मेश्राम, शिल्पा चुटे, अंकुबाई भुक्या, ताहेर हुसेन नासिर मोहम्मद शेख, वर्षा दानव, मोना धानोरकर, देवेंद्र आर्य, वैशाली हुमने, अब्दुल करीम, प्रियंका थुलकर, सय्यद मुक्कदर सय्यद हमजा, माजी नगरसेवक नासीर खान, ॲड.मेघा भाले, सुयोग खोब्रागडे, मिना मुंदडा, शारदा माकोडे, इस्माईल ढाकवाला, यश माकोडे, सुनीता जिवतोडे, विनोद आत्राम, नंदा ठाकूर, कांचन गुंडलापेल्ली, रवि मातंगी, सुर्यकांत साळवे, पंकज बहुरिया, करूणा रेब्बावार, ज्योती बहुरिया, लक्ष्मण बिहारी यादव यांच्या निवडीवर 83 हजार 821 मतदार शिक्कामोर्तब करणार आहे. याचा उलघडा 3 डिसेंबर रोजी लागणाऱ्या निकालात होणार आहे.

error: Content is protected !!