Home राजकीय बल्लारपूरच्या नगरपालिका निवडणुकीत कांग्रेस परिवर्तन घडविणार

बल्लारपूरच्या नगरपालिका निवडणुकीत कांग्रेस परिवर्तन घडविणार

678

कांग्रेस विधीमंडळ गट नेते विजय वडेट्टीवार

कांग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

बल्लारपूर : राज्यातील महायुतीच्या सरकार मध्ये सत्तेच्या तिजोरीसाठी मारामारी सुरु आहे. ज्यांचे एकमेकाशी पटत नाही. ते स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याची वल्गना करत आहे. ते धनसक्तीच्या बळावर मतदारांना प्रलोभन देत आहे.बल्लारपूर शहरातील इतिहास सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक उज्वल आहे. यामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पक्षापासून मतदारांनी सावध राहावे.आगामी नगरपालिका निवडणुकीत कांग्रेस पक्ष परिवर्तन घडविणार असून सत्ता प्राप्त करणार आहे, असा विश्वास कांग्रेस विधीमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी बल्लारपूर येथे व्यक्त केला.

.       बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दरम्यान स्थानिक महात्मा गांधी पुतळ्याजवळ गांधी चौक येथे येथील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अलका अनील वाढई व 32 नगरसेवकांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली.यावेळी ते बोलत होते.

.       यावेळी मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, जिल्हा मध्यवर्ती बँक माजी अध्यक्ष संतोषसिंग रावत, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका वाढई, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. अनील वाढई, माजी उपाध्यक्ष डॉ. सुनील कुल्दीवार, नंदु नागरकर, प्रवीण पडवेकर, एल.के.बल्की, भारत थुलकर, भास्कर माकोडे, शहर कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी अध्यक्ष अब्दुल करीम यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांची उपस्थिती होती.

.       यावेळी आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, कांग्रेस पक्ष मोठा आहे. या पक्षात नेते येतील. काही कारणामुळे जातील. पण या पक्षांची विचारसरणी सर्वसमावेशक आहे. सत्ताधारी पक्ष धनसक्तीच्या बळावर निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. या क्षेत्रातील आमदारांचे राजकीय कारगिद्रीचे वय झाले एकत्तीस व त्यांना विचारत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, असी कोपरखळी त्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे नाव न घेता केली. सभेत प्रास्ताविक शहर कांग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदांच्या उमेदवारांना मतदारांनी निवडून देण्याचे आव्हान मतदारांना केले. संचालन माजी शहर अध्यक्ष अब्दुल करीम यांनी केले. आभार प्रदर्शन नरेश मुंदडा यांनी केले. यावेळी शहरातील मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बल्लारपुरात अब की बार, कांग्रेस सरकार – खासदार प्रतिभा धानोरकर                                                                                                                                                                                       स्थानिक स्वराज्य संस्थेत मागील चार वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. ही राजवट म्हणजे एकाप्रकारे जंगलराज व्यवस्था लादण्याचा घाट आहे. आता मतदारांना मोठी संधी मिळाली आहे. शहरातील मतदारांनी संधीचे सोने करावे. आपल्या समस्या निवारण्यासाठी कांग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका वाढई व नगरसेवक करणार आहे. येथे कांग्रेसचे बहुमताने सरकार निवडून येणार असून बल्लारपुरात अब बार, कांग्रेस सरकार, असे चित्र आहे, असा आशावाद खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी एल. के. बल्की, माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका वाढई, भारत थुलकर, डॉ. अनील वाढई, संतोषसिंग रावत यांनी सभेला मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!