Home विशेष पती ही नाही आणि वडील पण जिवंत नाही कुणाचे जोडणार आधार ?

पती ही नाही आणि वडील पण जिवंत नाही कुणाचे जोडणार आधार ?

566

ई-केवायसी करताना पती किंवा वडील दोनच पर्याय

“लाडकी बहीण” योजनेत सॉफ्टवेअरचा अडथळा

लाडकी बहीण योजनेला कायमचे मुकावे लागणार

   रवी खाडे

चंद्रपूर : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण’ योजना ही महिलांच्या आयुष्यातील परिवर्तनाची नवी दिशा ठराली आहे. मात्र या योजनेची केवायसी करताना पती अथवा वडिलांचे आधार कार्ड जोडण्याची अट काही महिलांसाठी मोठी जाचक ठरत आहेत. त्यांना आता लाडकी बहीण योजनेला कायमचे मुकावे लागणार की काय अशी भीती सतावत आहे.

.       राज्य शासन महिला सबळीकरणाच्या उद्देशाने लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 ची आर्थिक मदत मिळते. लाडक्या बहिणीना सप्टेंबर महिन्याचा हप्ता काहीच्या बैंक खात्यात जमा झाला.

.       त्यामुळे महिला आनंदित आहे. त्यांना दिवाळीपूर्वीच थोडीफार रक्कम हाती आली आहे. अनेक महिला ई-केवायसीसाठी मोठी कसरत करत असल्याचे दिसते. काही दिवस साईट डाऊन असल्याने फक्त रात्रीच ई-केवायसीची प्रक्रिया करत होते आता मात्र साईड व्यवस्थित सुरु झाल्याने महिलांची गर्दी वाढली मात्र ई-केवायसीतील एक मोठी अट काही लाडक्या बहिणीची काळजी वाढवणारी ठरली आहे.

.        केवायसीसाठी पती किंवा वडिलांच्या आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक असल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ई-केवायसी करताना पती अथवा चडिलांचे आधार कार्ड जोडण्याची अट काही महिलांसाठी मोठी जाचक ठरत आहे. ज्यांच्या आयुष्यात पती किंवा बडील नाहीत, अशा महिलांना केवायसी पूर्ण करणे अशक्य होत असून, आता लाडकी बहीण योजनेला कायमचे मुकावे लागणार की काय?” अशी भीती त्यांना सतावत आहे. याप्रकरणी सरकारने तातडीने उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी विविध स्तरांवरून होत आहे.

.       या परिस्थितीमुळे अनेक बहिणींच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत. “आमचं अस्तित्व आमच्या आधारावर का नाही ? पती वा वढील नसल्यामुळे आम्ही लाडक्या नाही का?” असा भावनिक प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे.

.             या योजनेपासून वंचित…

शासनाने तातडीने सॉफ्टवेअरमध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा पर्याय उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा हजारो पात्र महिला या योजनेपासून वंचित राहतील आणि शासनाच्या महिला सक्षमीकरणच्या उद्दिष्टांवर प्रश्नचिन्ह उभं राहील,
लाडकी बहीण योजनेचा हेतू स्त्रीला आलमनिर्भर बनविण्याचा आहे, पण तांत्रिक त्रुटीमुळेच जर ती वंचित राहत असेल, तर हे शासनाची ही योजना फक्त निवडणुकी पुरतीच का?” असा सूर आता उमटू लागला आहे.
शासनाने तातडीने वा सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करून कोणतीही महिला वंचित राहू नये, यासाठी ठोस उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.
error: Content is protected !!