भद्रावती : कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीच्या उपबाजार आवार चंदनखेडा येथे आज शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी शेतमाल खरेदीचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे होते.
![]()
. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीचे सभापती राजेंद्र डोंगे तसेच उपसभापती अश्लेषा भोयर (जीवतोडे) उपस्थित होत्या.
. कार्यक्रमादरम्यान सोयाबीन विक्रीसाठी शेतमाल आणल्याबद्दल पारोधी येथील शेतकरी रामदास रामटेके, चंदनखेडा येथील विठ्ठल जीवतोडे आणि पारोधी येथील वामन विरुटकर यांचा आमदार करण देवतळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व ‘ग्रामगीता’ पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.


