Home सामाजिक शारदा देवीच्या अग्निहवनात मोराचे अद्भुत दर्शन

शारदा देवीच्या अग्निहवनात मोराचे अद्भुत दर्शन

819

वरोरा शहरात जय अंबे शारदा उत्सव मंडळाने नवरात्र उत्सव धार्मिकतेने साजरा केला

वरोरा : जय अंबे शारदा उत्सव मंडळ, वरोरा या शहरात नवरात्र उत्सव धार्मिकतेने आणि उत्साहाने साजरा करतो. यावेळी सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान शिबिर, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, अन्नदान आणि वृक्षारोपण यांसारखे उपक्रमही राबविले जातात. पारंपारिक परंपरेनुसार धार्मिक कार्य करताना नवमीच्या दिवशी मॉ. शारदा देवीच्या हवनात अग्नीतून मोराचे दर्शन घडले.

.      मोर हा देवीच्या वाहनाचे प्रतीक मानला जातो. अग्निहवनात मोराचे दर्शन होणे मंडळासाठी देवीचे आशीर्वाद असल्याचे मानले जाते. मंडळाचे अध्यक्ष आलेख रठे यांनी सांगितले की, “मा शारदा देवी नवसाला पावणारी आहे आणि येथे येणाऱ्या लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात. आम्ही प्रत्येक वर्षी थाटामाटात तिची पूजा-अर्चना करून तिची सेवा करतो.” हा अद्भुत अनुभव उपस्थितांना धार्मिक आणि आध्यात्मिक आनंद देणारा ठरला.

error: Content is protected !!