Home सामाजिक चित्रकलेच्या परीक्षेत रमले विद्यार्थी

चित्रकलेच्या परीक्षेत रमले विद्यार्थी

618

बल्लारपूर परीक्षा केंद्रावर २४0 विद्यार्थ्यांचा सहभाग

अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थ्यांत स्पर्धा

बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य शासकीय कला शिक्षण मंडळाच्या वतीने बुधवार (दि. २४) पासून एलिमेंटरी व इंटरमीडिएट चित्रकला परीक्षा सुरु झाली आहे. या परीक्षेसाठी बल्लारपूर येथील जनता माध्यमिक विद्यालय सिटी ब्रांच शाळेत २४0 परीक्षा केंद्रावर चित्रकला परीक्षेत सहभागी झाले आहे. विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांसाठी चित्रकला परीक्षेत स्पर्धा दिसून येत आहे. यामुळे चित्रकला परीक्षेत विद्यार्थी रमल्याचे चित्र परीक्षा केंद्रावर दिसून आले.

.      राज्य शासकीय कला शिक्षण मंडळाने एलिमेंटरी ग्रेड परीक्षा २४ व २५ सप्टेंबर दरम्यान, तर इंटरमीडिएट चित्रकला परीक्षा २६ व २७ सप्टेंबर दरम्यान घेण्याचे नियोजन केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन मिळते. बल्लारपूर येथील परीक्षा केंद्रावर एलिमेंटरी ग्रेड गटात १२७ विद्यार्थी, तर इंटरमीडिएट चित्रकला विषयांत ११3 असे एकूण २४0 विद्यार्थी चित्रकला परीक्षा देत आहे. चित्रकला परीक्षेत मिळणाऱ्या बोनस गुणांमुळे विद्यार्थ्यांत स्पर्धा आहे. चित्रकला परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना वस्तू चित्र, स्मरण चित्र, संकल्पनेतून कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन अशा चार प्रकारात चित्रकला परीक्षेला सामोरे जावे लागते आहे.

.       यावर योग्य चित्रकला प्रकारासाठी राज्य शासकीय कला शिक्षण मंडळ मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना ग्रेड दिले जाणार आहे. ही परीक्षा शासनाच्या निर्णयानुसार घेतली जात असल्याची माहिती परीक्षा केंद्र प्रमुख व प्राचार्य व्ही. के. लांडे व सहाय्यक शिक्षक सुनील टोंगे यांनी दिली.

error: Content is protected !!