Home सामाजिक राष्ट्रमाता कनिष्ठ महाविद्यालय देवाडा खुर्द‌‌‌ येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे स्वयंशासन

राष्ट्रमाता कनिष्ठ महाविद्यालय देवाडा खुर्द‌‌‌ येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे स्वयंशासन

666

चंद्रपूर : भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रमाता ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ देवाडा खुर्द द्वारा संचालित राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देवाडाखुर्द‌‌‌ येथे विद्यार्थांचे स्वयंशासन घेण्यात आले.विद्यार्थ्यांनी स्वतः शाळा चालवली.

.       प्राचार्य समृध्दी रमेश मंडरे आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजन करून स्वयंशासन पार पाडले. शेवटी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य दिलीप मॅकलवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मालार्पण करण्यात आले.

.        शालेय स्वयंशासन यांचे मुल्यमापन करण्यात आले त्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थांना बक्षीस देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच रविंद्र टिकले आणि सुनील शेरकी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

.        प्राचार्य दिलीप मॅकलवार यांनी अध्यक्ष स्थानावरून शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारी व्यक्ती नाही तर तो विद्यार्थांच्या आयुष्याला दिशा देणारा एक शिल्पकार असतो.शिक्षण केवळ चांगले गुण मिळविण्यासाठी नाही तर एक चांगला माणूस बनण्यासाठी असते.आजच्या युगात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, मित्र आणि तवज्ञ बनले पाहिजे.विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे.असे मत व्यक्त केले.

.      कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंशासन चे प्राचार्य समृध्दी रमेश मंडरे, संचालन संजय नागुलवार आणि श्रद्धा गद्देकार तर आभारप्रदर्शन लावण्या गद्देकार यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!