नंदीबैल सजावटीत पियुष ठाकूर प्रथम
दोनशेवर नंदीबैल धारक बालशेतकऱ्यांचा सहभाग
बल्लारपूर : बाल शेतकऱ्यांनी नंदीबैल सजावट कौशल्याने केली. वर्तमान समस्या, देशाप्रती आपुलकीची भावना, जय जवान,जय किसान चे महत्व अधोरेखित करणारा देखावा, पहलगाम हल्ल्यातील ऑपरेशन सिंदूर,आकर्षक सजावट करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गावातील दोनशेवर बालशेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.उत्कृष्ट नंदीबैल सजावट स्पर्धेत पियुष हेमंत ठाकूर या बालशेतकऱ्यांचा प्रथम पुरस्कार प्रदान करून तान्हा पोळा उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गौरव केला. यावेळी तान्हा पोळ्यात सहभागी प्रत्येक बालशेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने टिफिन बाक्स प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
![]()
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील श्री पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालय प्रांगणात अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांच्या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून दरवर्षी तान्हा पोळा आयोजित केला जात आहे. यामध्ये यंदा दोनशेवर बालशेतकऱ्यांनी नंदीबैल घेऊन उत्कृष्ट देखाव्याचे सादरीकरण केले. विसापूर ग्रामपंचायत तर्फे पहिल्यांदा सर्व सहभागी नंदीबैल धारक बालशेतकऱ्यांना टिफिन बाक्स प्रदान करुन गौरव केला. त्याच प्रमाणे तान्हा पोळा उत्सव समितीच्या वतीने नंदीबैल सजावट स्पर्धा घेतली. यामध्ये प्रथम पियुष हेमंत ठाकूर, द्वितीय अन्वय भूषण परसूटकर,तृतीय कार्तीक रवि हरणे,चतुर्थ मिश्री महेश आस्वले,पाचवे मीत सचिन उरकुडे, सहावे शिवम प्रकाश रोंगे, त्याच प्रमाणे प्रोत्साहन बक्षीस शुत्रुत प्रदीप लांडगे, छवी सचिन नांदे,दक्ष मनोज काकडे, विनीत संजय खाटीक,आराध्या विलास भोयर व समिरा कुटेकर या बालशेतकऱ्यांना उत्कृष्ट नंदीबैल सजावट केल्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले.
. तान्हा पोळा उत्सव समितीचे नरेंद्र इटनकर, सुरेश पंदीलवार, प्रभाकर टोंगे, चंद्रकांत पावडे, डॉ. सुनील बुटले, प्रभात भोजेकर, संदीप गौरकार, पांडुरंग साळवे, शंकर गिरडकर, अशोक थेरे, शालिक नांदे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करुन नंदीबैल धारक बक्षीस प्राप्त बालशेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मार्फत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, वैशाली पुणेकर, हर्षला टोंगे, संदीप काकडे, विद्या देवाळकर, प्रदीप गेडाम, लिपीक संतोष निपुंगे, राहूल टोंगे, अशोक ठुणेकर यांचे मार्फत बालशेतकऱ्यांना टिफिन बाक्स वितरण करण्यात आले. पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयाच्या वतीने खेळणी साहित्य प्रदान करुन सन्मानित केले. यावेळी गावाला जत्रेचे स्वरूप आले होते.

