Home सामाजिक विसापुरात पुरांची वेदना बाजुला सारून चढवला सर्ज्याराजावर साज !

विसापुरात पुरांची वेदना बाजुला सारून चढवला सर्ज्याराजावर साज !

672

पहिल्यांदा साजरा झाला अनोखा बैल पोळा

बैलजोडी सजावट स्पर्धेत ७२ शेतकऱ्यांचा सहभाग

बल्लारपूर : अलीकडे वर्धा नदीला पूर आला होता. पुरामुळे शेतपिकांची नासाडी झाली. याची वेदना बाजुला सारून बळीराजाने बैल पोळ्यात सर्ज्याराजावर साज चढविला. बैलजोडी स्पर्धेत तब्बल ७२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. विसापूरच्या पंचक्रोशीत पहिल्यांदा अनोखा बैलपोळा साजरा केला.यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक कार्यकर्त्ये,राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बळीराजा प्रती कृतज्ञतापूर्वक भेट वस्तू प्रदान करून बैलजोडी धारक शेतकऱ्यांचा सन्मान केला.

.            बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालय परीसरात बैलजोडी सजावट स्पर्धा पहिल्यांदा आयोजित केली. यामुळे गावात जत्रेचे स्वरूप आले. विशेष म्हणजे सजावट केलेल्या बैलजोडीचे परिक्षण करण्यासाठी दुसऱ्या गावातील परिक्षक आले.यामुळे पोळ्यात होणाऱ्या वादावर विराम बसला. बैलजोडी सजावट स्पर्धेत प्रथम आकाश बंडू थेरे,द्वितीय आशिष सत्यपाल पादे, तृतीय अनिकेत गिरडकर, चौथे अमोल मधुकर भोयर,पाचवे सचिन डाहुले, सहावे अक्षय पाटणकर, सातवे रविंद्र येवले, आठवे रविंद्र ताजने,नववे हंसराज ताजने व दहावे साईनाथ थेरे यांना ग्रामपंचायत मार्फत शेती उपयोगी साहित्य प्रदान करुन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

.         त्याच प्रमाणे सहभागी बैलजोडी धारक शेतकऱ्यांना फवारणी पंप व वाटर जग देखील वितरण करण्यात आले. माजी अर्थ, नियोजन व वन मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने प्रत्येक बैलजोडी धारक शेतकऱ्यांना दिवाल घडी व माजी जिल्हा परिषद सदस्य सुमनताई गौरकार यांच्या मार्फत छत्रीचे वाटप करण्यात आले. पोळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक बैलजोडी धारक शेतकऱ्यांचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी औक्षण करुन टावेल देण्याची परंपरा जोपासली. विशेष म्हणजे मधुकर भोयर यांनी बळीराजा व्यथेवर गीतगायन करून शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

.         बैलजोडी सजावट स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रभाकर देरकर, निशांत मोरे, डॉ. सुनील आलाम, उमेश देवाळकर व बंडू ठाकरे यांनी योगदान दिले. यावेळी सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, सुरज टोमटे, रिना कांबळे, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, गजानन पाटणकर, माजी उपसरपंच सुनील रोंगे, सुरेखा इटनकर, प्रदीप गेडाम, दिलदार जयकर, शशीकला जीवने,विद्या देवाळकर, संदीप काकडे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश कोकोडे, लिपीक संतोष निपुंगे, राहूल टोंगे, अशोक ठुणेकर व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!