Home विशेष कांग्रेसच्या मतचोरीच्या आरोपाचे बल्लारपुरात पडसाद

कांग्रेसच्या मतचोरीच्या आरोपाचे बल्लारपुरात पडसाद

676

तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन 

कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा हल्लाबोल

बल्लारपूर  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान मतचोरीचा प्रकार इंडिया आघाडीचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी उघड केला. यामुळे निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात आला आहे.याबाबत बल्लारपूर शहर व तालुका कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मतचोरीवर आक्रमक भूमिका घेऊन नगरपालिका चौकात आज गुरूवारी सकाळी ११ वाजता स्वाक्षरी मोहिम राबवली. निवडणूक आयोग व सत्ताधारी पक्षाने मतचोरीतून सरकार आले. असा आरोप करत बल्लारपूर उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल करून निदर्शन केले.दरम्यान तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करून सत्ताधारी पक्ष व केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मिलीभगत कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली.

.          भारतीय संविधानाने प्रत्येक प्रोढ मतदारांना मतदानाचा हक्क दिला आहे. मात्र संविधानात्मक संस्था आजघडीला वादाच्या भोवऱ्यात आली आहे. निवडणूक आयोग व सत्ताधारी पक्ष एका प्रकारे घटनात्मक पाया कमकुवत करत आहे. यावर देशाच्या राष्ट्रपतींनी लक्ष द्यावे. सामान्य जनतेच्या हिताचे रक्षण करावे, असी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. दरम्यान बल्लारपूर नगरपालिका चौकातून घोषणाबाजी करत तहसील कार्यालयपर्यंत मार्च काढला. त्यानंतर कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले.

.         यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव घनश्याम मुलचंदानी,शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, तालुका कांग्रेसचे अध्यक्ष गोविंदा उपरे,जेष्ठ नेत्या डॉ.रजनी हजारे,माजी नगराध्यक्ष डॉ. मधुकर बावणे,छाया मडावी, सुनंदा आत्राम, डॉ. सुनील कुल्दीवार,सुरेश गलानी,अफसाना सय्यद, ॲड.मेघा भाले,भास्कर माकोडे,प्राणेश अमराज,सत्यशीला साळवे, इस्माईल ढाकवाला,नरेश मुदंडा,ॲड.पवन मेश्राम, अनील वाग्दरकर यांचा निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात समावेश होता.

.          आंदोलनच्या यशस्वीतेसाठी अनील खरतड,नाना बुंदेल,कासिम शेख,प्रितम पाटील, ॲड.सय्यद, मेहमूद पठाण, नरेश आनंद, मंगेश बावणे,लखपती घुगलोत,वर्षा दानव,सुनिता वाघमारे, विनोद आत्राम आदींनी सहकार्य केले.

error: Content is protected !!