Home सामाजिक अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना शिवसेनेकडून श्रद्धांजली

अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना शिवसेनेकडून श्रद्धांजली

849
  • वरोऱ्यातील “शिवालय” कार्यालयात आयोजित शोकसभा

वरोरा : अहमदाबाद येथे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वरोरा येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय “शिवालय” येथे दिनांक १३ जून २०२५ रोजी ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.

मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख रवी शिंदे

.       या शोकसभेला शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख रविंद्र शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सामूहिकरित्या श्रद्धांजली अर्पण करून मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थना केली.

.        विमान अपघातामुळे देशभरात हळहळ व्यक्त होत असतानाच, वरोऱ्यातही शिवसेनेकडून या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या.

error: Content is protected !!