येंसा येथील घटना
वरोरा : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने अनेकांची झोप उडवली. अशातच वरोरा तालुक्यातील येंसा येथील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यावर विजेची जिवंत विद्युत तारा पडल्या. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात युवकांचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्ताची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. रूपेश सूर्यभान बोथले (३०) असे मृतक युवकाचे नाव आहे.
. वरोरा तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, विजेच्या कडकडाट व जोरदार वादळ वाऱ्यामुळे अक्षरशः अनेकांच्या घराची छते उडाली. तर वीज कोसळून जनावरे ठार झाली. अशातच येंसा येथील बोथले यांच्या घरालागत शेळ्याचा गोठा आहे. अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने विजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडित झाला होता. विद्युत पोल ची तुटलेली जिवंत विद्युत तार शेळ्याच्या गोठ्यावर व काही शेळ्यावर पडली. शेळ्याना विजेचा धक्का बसल्याने शेळ्या ओरडायला लागल्या. शेळ्या का ओरडत आहे म्हणून झोपलेला रुपेश शेळ्याच्या गोठ्याकडे गेला. गोठ्याचा आत प्रवेश करताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. घरचे झोपून पहाटे उठताच रुपेश दिसत नाही म्हणून बाहेर निघाले व शेळ्याच्या गोठ्याकडे पाहताच 4 शेळ्या सोबत रुपेशही मृत्युंमुखी पडल्याचे दिसून येताच घरच्यांनी हंबरडा फोडला. शेजार्यांनी तात्काळ वीज वितरण कंपनीला माहिती दिली.
. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे. रूपेश हा जीएमआर कंपनीत काम करीत होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.