आलेख रट्टे यांचे नेतृत्व
भद्रावती : शिवसेना पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत डोलारा येथील चंडिका वॉर्डामध्ये शिवसेना युवासेनेची शाखा थाटामाटात सुरू करण्यात आली, या उद्घाटनप्रसंगी परिसरातील युवकांचा उस्फूर्त सहभाग आणि शिवसेनेच्या विचारांप्रती असलेला विश्वास प्रकर्षाने जाणवला.
. या उद्घाटन समारंभाला वरोरा-भद्रावती समन्वयक मुनेश्वर बदखल, वरोरा तालुका सचिव रितिक जाधव, युवा सैनिक राज चौहान, अमित घोडमारे, वेदांत गजबंद, भूषण जाधव यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोलारा येथील शाखेची जबाबदारी सुमित मोइजे यांच्याकडे शाखा प्रमुख म्हणून सोपविण्यात आली असून, अनिरुद्ध रामटेके यांची शाखा संपर्क प्रमुख, सिद्धार्थ मेश्राम यांची शाखा सचिव, तर सचिन माहुरे यांची शाखा बुथ प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. यासोबतच सागर इंगोले, आदित्य खोब्रागडे व येलेश राऊत या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.