वरोरा : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला महान अशी घटना दिली, समता न्याय बंधुत्व या साठी आपले जीवन बहाल केले संविधाना मुळे हा देश एकसंघ आहे व सर्वधर्म समभावाने येथील जनता आनंदात राहतात अशा महान महामानवाच्या जयंती च्या निमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चॉक वरोरा येथे भव्य लस्सी वाटप करण्यात आले.
. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी नयोनी साठम, पोलीस निरीक्षक अजिक्य तांबाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय देवतले, सभापती बांधकाम दत्ता बोरेकर, सामजिक कार्यकर्ता अतुल वानखेडे यांनी भीम अनुयांना मार्गदर्शन केले. यावेळी अहेफाज शेख, मितेश शर्मा, बाळू भोयर, विलास टिपले, अयुब पठाण, विजय पुरी, निलेश कुमरे, अक्षय कुलकर्णी, अमित चोरोडिया, जितेंद्र कामडे, आशिष रठ्ठे, बाबा शेख, धीरज सोमलकर, अयान शेख, प्रशांत गावंडे, सर्वांचे अतुल वानखेडे मित्र परिवार तर्फे स्वागत करण्यात आले.


