Home सामाजिक लोक विद्यालयात महामानवाला अभिवादन

लोक विद्यालयात महामानवाला अभिवादन

977

ब्रह्मपुरी : दि रुरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित लोक विद्या तथा उच्च माध्य. विद्यालय गांगलवाडी येथे महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.

.    कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य सुरेश बुरडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महामानवाला अभिवादनाने करण्यात आली. जयंतीनिमित्त विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी महामानवाला अभिवादन केले.

.    कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून सुरेश बुरुडे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक, समतावादी, कल्याणकारी विचार त्यांनी देशाला अर्पण केलेल्या भारतीय संविधानात प्रतिबिंबित होतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही चतुसूत्री वास्तविक जीवनामध्ये किती प्रभावशाली ठरू शकते हे असे प्रतिपादित केले.

.     ज्या महामानवाची जयंती भारतासह 156 देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते त्या व्यक्तीचे विचार किती दूरदृष्टी कोणातून असतील याची जाणीव आजही क्षणोक्षणी होते असे विचार त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर जुमनाके यांनी तर आभार पद्माकर रामटेके यांनी मानले.

error: Content is protected !!