Home सामाजिक भिसी येथे धनगर समाज व मल्हार सेना कार्यकर्ता शिबिराचे आयोजन

भिसी येथे धनगर समाज व मल्हार सेना कार्यकर्ता शिबिराचे आयोजन

995

चिमूर : महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना कार्यकर्ता शिबिराचे १३ एप्रिल २०२५ रोज रविवार ला शिवाजी पब्लिक स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज भिसी येथे आयोजन करण्यात आले आहे.

.      या शिबिराचे उद्घाटक शिवाजी पब्लिक स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य ज्ञानेश्वर शिरभय्ये करणार आहेत तर शिवाजी पब्लिक स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज चे संस्थापक नितेश उघडे हे शिबिराचे अध्यक्षस्थानी असणार आहेत प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य धनगर महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोकराव शेळके उपस्थित राहणार आहे.

.     १२ ते २ वाजता पर्यंत मार्गदर्शन होणार आहे. यानंतर अर्धा तास विश्रांती असणार आहे. या विश्रांती नंतर अडिच ते साडेतीन वाजे पासून पुन्हा मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरास जास्तीत जास्त समाज बांधवानी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र धनगर समाज महासंघ जिल्हा प्रसिद्धप्रमुख श्रीकांत शेरकी यांनी केले आहे.

error: Content is protected !!