Home सामाजिक संविधानात लोककल्याणाची संकल्पना अंतर्भूत आहे

संविधानात लोककल्याणाची संकल्पना अंतर्भूत आहे

985

गिरीश घायगुडे यांचे प्रतिपादन

विसापूर येथे संविधान जागर कार्यक्रम

बल्लारपूर : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीसाठी कठोर परिश्रम घेतले आहे. हजारो वर्षासाठी संविधान मार्गदर्शक राहणार आहे.हे संविधान घराघरांत असेल पाहिजे.शासनाचे हेच धोरण आहे.ही राज्य घटना लोकांसाठी समर्पित केली आहे. ७५ व्या वर्षात याचे महत्व अधिक अधोरेखित होत आहे. सर्व घटकांना सामाजिक न्याय, समतेचे मूल्य, बंधुत्व, लोकशाही, राजकीय, समाजवादी विचार आपणास प्रेरणादायी आहे. खऱ्या अर्थाने संविधानात लोककल्याणाची संकल्पना अंतर्भूत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश घायगुडे यांनी विसापूर येथील संविधान जागर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी केले.

.       बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात चंद्रपूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, बल्लारपूर पंचायत समिती व विसापूर ग्रामपंचायतीच्या वतीने घर घर संविधान उपक्रम अंतर्गत अश्विनी रोशन यांचा प्रबोधनात्मक संविधान जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी गिरीश घायगुडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना मालार्पण करून तथा दीप प्रज्वलित करून उदघाटन केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे, प्रभारी तहसिलदार महेंद्र फुलझेले, गटशिक्षणाधिकारी रविंद्र लामगे, विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, गायक कलावंत अश्विनी रोशन, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, वैशाली पुणेकर, हर्षला टोंगे, विद्या देवाळकर, दिलदार जयकर, शशिकला जीवने, ग्राम अधिकारी किशोर धकाते आदींची उपस्थिती होती.

.     तत्पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयापासून मान्यवरांना जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने कार्यक्रम स्थळी आणून आदरातिथ्य केले. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते संविधान पुस्तकांचे विद्यार्थ्यांना व नागरिकांना सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. यावेळी अनेकश्वर मेश्राम यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान अश्विनी रोशन यांनी संगीतमय संविधान जागर कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा सादर केला. प्रास्ताविक गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी संविधान जागर कार्यक्रमाची भूमिका विषद केली. संचालन शिक्षक शैलेश बरडे यांनी केले, तर आभार ग्रामपंचायत लिपीक संतोष निपुंगे यांनी मानले. यावेळी नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

error: Content is protected !!