वरोरा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेत आणि युवाशक्तीला संघटित करण्यासाठी आलेख रमेश रट्टे यांची युवासेना जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरोरा, चिमूर व ब्रम्हपुरी या तीन विधानसभा क्षेत्रांच्या कार्यक्षेत्रासाठी ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. युवासेनेचे कार्यकारणी सदस्य विभागीय सचिव शुभम शा. नवले यांनी नियुक्तीपत्र प्रदान करत आलेख रट्टे यांना पुढील सहा महिन्यांसाठी ही जबाबदारी दिली आहे.यावेळी युवासेनेचे कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे यांची उपस्थिती होती
. या नियुक्तीमुळे आलेख रट्टे यांच्यावर युवासेना संघटनेच्या अधिक बळकट बांधणीसाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार तसेच धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण जनतेपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी येणार आहे.