वेकोलीचा स्तुत्य उपक्रम
वरोरा : क्षेत्रीय चिकित्सालय माजरी आणि सुरभी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने थोराणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गावातील तब्बल १२५ जणांची आरोग्याची तपासणी करण्यात आली. वेकोलीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
. या शिबिराचे उद्घाटन माजी पोलीस पाटील शंकर बोदाडकर यांनी केले. अध्यक्षस्थानी दत्तु भट हे हॊते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास बोदाडकर, मुख्याध्यापक अरुण उमरे, स. शि. वाभीटकर, डॉ. अर्चना धुर्वे-उंबरकर, डॉ. निखिल बुटले, डॉ. कांचन जांभुळे आदी उपस्थित होते.
. यावेळी डॉ. निखिल बुटले यांनी क्षय रोगाविषयी माहिती देत त्याला कसा आळा घालता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. कांचन जांभुळे यांनी उष्माघाताविषयी मार्गदर्शन केले. डॉ. अर्चना उंबरकर यांनी विद्यार्थ्यांना बॅड टच-गुड टच याविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान शाळेतील माही भोयर, रेणू रिंगोले, अवनी काळे, निकिता घुले आणि आर्यन जेट्टे या चिमुकल्यांनी “पोक्सो” कायद्याअंतर्गत नाटिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
. वेकोलीचे क्षेत्रीय चिकित्सा अधिकारी डॉ. आर. एन. किशोर यांच्या मार्गदर्शनात आयोजित आरोग्य शिबिरात गावातील लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. विविध आजार असणाऱ्या लोकांना औषधोपचार करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील १३ विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकवृंदांची आरोग्य तपासणी करण्यात आली,
. या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार डॉ. निखिल बुटले यांनी केले. या आरोग्य शिबिरात भूपेंद्र सिंग, मनोज गुप्ता, प्रिती यादव, विलास पिदूरकर, गजानन आस्वले, रुपाली फुलझेले, केविनी पिदूरकर आदींनी आपली मोलाची भूमिका बजावत सहकार्य केले. अंगणवाडी कर्मचारी उज्वला बोदाडकर, सुषमा भट, शापोआ कर्मचारी उषा रिंगोले आदींनी विशेष सहकार्य केले. या शिबिराची अल्पोपहाराने सांगता झाली.


