चिमूर : शंकरपुर येथील शुभम लहानेची शासकीय वैद्यकीय महाविदयालय चंद्रपुर येथे प्रयोगशाळा सहाय्यकपदी नुकतिच निवड झाली.
. शुभम हा धनगर भटक्या जमातीचा असुन शिक्षणाचे प्रमाण अल्प असले तरी शुभम लहाने यांचे शिक्षण सावरी, गोंदीया येथे झाले. होते शुभम ला वैद्यकीय क्षेत्रात आवड असल्याने वैद्यकीय क्षेत्रात विविध कोर्स पदवी प्राप्त करून आपल्याला आपले आवडीचे क्षेत्र मिळविण्यासाठी परत नागपुर येथे शिक्षण घेतले. शुभम हा कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटीच्या रोषावर शासकीय वैदयकीय महाविद्यालयात चंद्रपुर येथे प्रयोगशाळा सहाय्यकपदी अखेर निवड झाली. या निवडी बद्दल त्याचे महाराष्ट्र मल्हारसेना व महाराष्ट्र धनगर समाज महासंघ च्या वतिने शकरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक शेळके, मल्हारसेना उपाध्यक्ष दीपक उघडे चंद्रपूर, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख चंद्रपूर व वंचित बहुजन युवा आघाडी उपाध्यक्ष श्रीकांत शेरकी, लक्ष्मण शेरकी, प्रफुल खोब्रागडे, यशवंत तुरारे, सतीश कोल्हे,सूचित लहाने उपस्थित होते व परिसरात सर्वत्र अभिनंदनाचा शंकरपूर समाज वासियान कडून वर्षाव केला होता.


