Home सामाजिक सामाजिक कुप्रथेवर भाष्य करणारे “बाजारी विकलेली नार” अर्थात भाड्याची बायको सर्वोत्कृष्ट नाटक

सामाजिक कुप्रथेवर भाष्य करणारे “बाजारी विकलेली नार” अर्थात भाड्याची बायको सर्वोत्कृष्ट नाटक

1128

महेंद्र कोवले

  सिंदेवाही : खरं तर पूर्व विदर्भातील झाडीपट्टी मध्ये नाटकाची परंपरा फार पूर्वीपासून सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांच्या हंगामानंतर दिवाळी या सणापासून प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये नाटकांना सुरुवात होत असते. झाडीपट्टी रंगभूमीवर अनेक हौशी कलावंताकडून सामाजिक, कौटुंबिक, आणि सत्य घटनेवर आधारित अनेक विषयांवरील नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येतात. यावर्षी नागभीड – वडसा येथील शिवम् थिएटर्स निर्मित, लेखक दिग्दर्शक, गायक, गीतकार, संगीतकार, युवराज गोंगले लिखित सामाजिक कुप्रथेवर भाष्य करणारे सत्यघटनेवर आधारित ” बाजारी विककेली नार” अर्थात भाड्याची बायको ” या नाटकाचा यावर्षीचा ५० वा प्रयोग तळोधी (बा.) येथे सादर करण्यात आला असल्याने यावर्षीचे हे सर्वात उत्कृष्ठ नाटक असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.

.        युवराज गोंगले लिखित “बाजारी विकलेली नार” अर्थात भाड्याची बायको ” या नाटकाची कथा ही सत्य घटनेवर आधारित असून वास्तवदर्शी आहे. स्वातंत्र्याच्या ७७ वर्षा नंतर आजही मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात महिलांचा बाजार भरवून जनावरांसारखी त्यांची बोली लावून त्यांना भाड्याने विकल्या जाते. हा अत्यंत लाजिरवाना आणि किळसवाणा प्रकार एक जबाबदार आणि प्रयोगशील लेखक म्हणून युवराज गोंगले यांनी या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या बाजारी विकलेली नार…या नाटकातील प्रसंग अत्यंत समर्पक पने लेखक युवराज गोंगले यांनी मांडले आहेत. बाजारी ….हे नाटक काजळी या पात्राच्या घटनेशी संबंधित असून तिच्या जीवनातील व्यथा, दुःख, आणि या कुप्रथेवर आघात करण्याचा काजळीचा निर्धार लेखकाने या नाटकातून मांडलेला आहे.
काजळी ही सारसकांत या तरुणावर मनापासून प्रेम करते, मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी बाप रामसू आणि भाऊ कोरम्या या दोघांच्याही लग्नाला विरोध करतात. आणि काजळीला “धडीचा” या बाजारात विकण्याची भाषा करतात. मात्र काजळी स्वतःला बाजारात विकायला तयार नसते. हतबल झालेली काजळी मात्र आपल्या पोटतिडकीने बाप आणि भावाला समजावण्याचा प्रयत्न करते. मात्र तिचे काहीच न ऐकणाऱ्या बाप आणि भावाला खडसावून सांगते की, मुलगी ही घराची इज्जत आहे. आणि भाड्याची बायको म्हणून तुम्ही तिला बाजारात विकता ? तुम्ही नामर्द आहात ? परंतु तिचा बाप रामसू आणि भाऊ कोरम्या हे दोघेही तिचे काहीही न ऐकता काजळीला गुंगीचे औषध देऊन “धडीचा” या बाजारात विकतात. परिसरातील चंचल ठाकूर आणि बेनिराम ठाकूर हे दलाल तिला विकत घेतात. आणि तिच्याकडून वेष्या व्यवसाय करवून लाखो रुपये कमावतात. कित्येक लोक तिला उष्टी करून जातात. यातून काजळी गर्भवती असते. परंतु शेवटी हे मुल कोणाचं? तिने आपल्या या मुलाला बाप म्हणून कोणाचं नाव लिहावं? हा प्रश्न ती या समाजाला विचारते. दिवसेंदिवस या कुप्रथेचा प्रभाव वाढत जातो. तेव्हा काजळी सारख्या मुलीच्या मनात विद्रोह करण्याचे विचार सुरू असतानाच काजळीवर प्रेम करणारा सारसकांत प्रशिक्षणानंतर सी.बी.आय.अधिकारी म्हणून परत येतो. धडीचा या नावाखाली बेपत्ता केले असलेल्या चोवीस मुलींना शोधून त्यांना मुक्त करण्याची जबाबदारी सारसकांत या सी.बी.आय.अधिकाऱ्यावर असते. त्यामुळे सारसकांत या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू करतो. आणि चंचल ठाकूर , बेनिराम ठाकूर यांचा पर्दाफाश करतो.

.     दारू, गांजा, विकून आपला उदरनिर्वाह करणारे मांज्या चुक्का, आणि डोंगरू सुख्खा, केसरिमल दरोग्याच्या हातात सापडतात. दरोगा त्यांना पोलिसी खाक्या दाखवून पोलीस मित्र करून घेतो. यावेळी मांज्या चूक्का आणि डोंगरू मामा, यांचा प्रसंगानुरूप असलेला विनोद नाटकात आणखीन चांगलीच रंगत आणतो. काजळीच्या पोटात असलेला गर्भ दिवसेंदिवस वाढत असतो. जन्माला येणाऱ्या बाळाला बाप म्हणून कोणाचे नाव देऊ? हा प्रश्न तिच्या समोर असतानाच सारसकांत हा तिच्या होणाऱ्या बाळाचा स्वीकार करतो. परंतु काजळी त्याला नकार देते. समाजातील एक सज्जन व्यक्ती म्हणून तू जरी मला स्विकराशिल ? मात्र समाजातील अशा माझ्यासारख्या कित्येक जनी गर्भ धरून घरी आल्या ,तर त्यांनी त्यांच्या पोराला बाप म्हणून कोणाचे नाव द्यावं? या प्रश्नाने सारसकांत सुद्धा निरुत्तर होतो. जेव्हा काजळीला बाजारात उभे करण्यासाठी तिचा भाऊ आणि वडील दबाव टाकतात. तेव्हा तिला होणाऱ्या वेदना, तिच्या व्यथा, व्याकुळता ही सर्व सहन करून मुलगी लग्नाआधी गरोधर असली, तर तिला शिक्षा म्हणून जात पंचायतीचे लो…

error: Content is protected !!