वरोरा : सनय बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर द्वारा संचालित छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय, सुर्ला (बोर्डा), ता. वरोरा येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल यावर्षी दिल्ली-मथुरा- आग्रा या ठिकाणी दि 23 फरवरी ते 27 फरवरी दरम्यान देण्यात आली होती. या सहली मध्ये एकूण 56 विद्यार्थी व 7 शिक्षकांचा समावेश होता.
. बी.ए. प्रशासकीय सेवा या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून या शैक्षणिक सहलीत दिल्ली येथील राष्ट्रपती भवन, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), कुतुब मिनार, लाल किल्ला, इंडिया गेट, अमृत उद्यान, राजघाट, गुरुद्वारा इत्यादी ठिकाणांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. राष्ट्रपती भवन चे कामकाज कसे चालते तसेच राष्ट्रपती भवन च्या निर्मितीपासूनचा इतिहास विद्यार्थ्यांनी समजून घेतला. ज्ञानाच्या क्षेत्रात देशात प्रसिद्ध असलेले जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) येथे भेट दिली. या ठिकाणी भुरा कादंबरीकार प्रा. डॉ. शरद बाविसकर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी JNU मध्ये चालणाऱ्या विविध अभ्यासक्रमाची माहिती प्राप्त केली.
. मथुरा येथील कृष्ण जन्मभूमीला भेट दिली तसेच आग्रा येथील आग्रा किल्ला व ताजमहल या दोन ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी अवगत केली. या पाच दिवसीय शैक्षणिक सहलीचा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक तसेच खाजगी जीवनात फायदा होईल.


