आ. बंटी भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती
नागभीड : येथील प्रसिद्ध महाशिवरात्री यात्रेच्या नियोजनासाठी अप्पर जिल्हाधिकारी घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार बंटी भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नागभीड नगर परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.
. यावेळी यात्रेच्या निमित्ताने विविध विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सोयी सुविधा यांचा आढावा आमदार बंटी भांगडीया यांनी घेतला. भाविक जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा कुठलीही अनुचित घटना घडता कामा नये यासाठी विशेष काळजी प्रशासनाने घेण्याच्या विशेष सूचना या आढावा बैठकीत आमदार महोदय यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जनतेच्या सेवेसाठी विविध ठिकाणी पाण्याच्या व्यवस्था, आरोग्य कॅम्प, रुग्णवाहिकेची सुविधा, पार्किंग व्यवस्था, अग्निशमन दल, विविध ठिकाणी स्वच्छता गृहे यांची उभारणी, बसफेऱ्या वाढविणे, भाविकांना दर्शन घ्यायला जाताना सुरळीत होईल असा मार्ग तयार करणे, उपवासाचे साहित्य वितरीत करतांना कुठलाही त्रास किंवा जमाव होऊ नये या सर्व बाबींची पूर्तता करण्यात यावी असे आमदार महोदय यांच्या कडून सूचित करण्यात आले.. १ मार्च ते ४ मार्च दरम्यान होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी विशेष पोलिस बंदोबस्त याचा आढावा उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे व नागभीड पोलिस स्टेशन चे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या कडून समजून घेण्यात आला तसेच नगर परिषद प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या कडून वाहन व्यवस्था, यात्रा मार्ग याबद्दल माहिती घेण्यात आली व आरोग्य विभागाच्या वतीने दोन दिवस आरोग्य कॅम्प लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल लागून असून हिस्त्र प्राण्याचा वावर असतो यासाठी वनविभागाच्या वतीने विशेष सुरक्षा करण्याच्या सूचना देण्यात आल्या
. सदर आढावा बैठकीला आमदार. बंटी भांगडीया, नागभीड शिवटेकडी देवस्थान चे विश्वस्त, अप्पर जिल्हाधिकारी घाडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, नागभिड तहसील चे तहसीलदार प्रताप वाघमारे, नागभीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ, वनपरीक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अरविंद रामटेके, विद्युत विभागाचे अभियंता, आरोग्य विभागाचे अधिकारी, राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी, तळोधी पोलिस स्टेशन च्या ठाणेदार हेलोंडे यासह विविध सेवा भावी संस्थेचे पदाधिकारी, नागभीड शिवरात्री महोत्सव समितीचे पदाधिकारी, पत्रकार, व्यापारी संघाचे विविध व्यापारी, नगर परिषदेचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.