Home सामाजिक जाणता राजा ग्रुपच्या वतीने काजळसर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

जाणता राजा ग्रुपच्या वतीने काजळसर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

1108

दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

नेरी : चिमुर तालुक्यातील काजळसर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जाणता राजा ग्रुपच्या वतीने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

.      दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जाणता राजा ग्रुप काजळसर च्या वतीने दि 19 फ्रेबु ला सकाळी ग्रामस्वछता करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधांनी किल्ले रायगड किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात येऊन महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर सकाळी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली यात अनेक महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तसेच गड किल्याची प्रतिकृती साकारली दुपारी शालेय विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अनेक शालेय मुलांनी गटा गटात भाग घेऊन महाराजांच्या जीवनावर आधारित निबंध लिहून स्पर्धेत भाग घेतला.

.       या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी आशिष नन्नावरे तर उद्घाटक म्हणून लालाजी मेश्राम हे होते. तर प्रमुख पाहुणे उद्धव बोरकर, अशोक खोब्रागडे, मनोहर सोनवाने, अशोक वाटगुरे, नंदू हटवाडे, रंजना नाकडे, पुष्पा पुस्तोडे, उदेभान बनसोड, गोपीचंद गजभिये, पंधरे मान्यवर म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी रीतसर विधिवत महाराजांचे पूजन करून महाराजांच्या जीवन चरित्यावर मार्गदर्शन केले. यावेळी संपूर्ण गावकरी उपस्थित होते यानंतर लगेच छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून ढोल ताश्या आणि डीजे च्या निनादात महाराजांच्या जयघोषात काढण्यात आली यावेळी बालगोपाल महिला पुरुष यांनी भाग घेतला होता बाल गोपाल यांनी मिरवणुकीत महाराजांच्या वेशभूषा केल्या होत्या तसेच ट्रकटर वर महाराजांची प्रतिकृती साकारण्यात आले होते. ते सर्व आकर्षणाचे केंद्र बिंदू बनले होते अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच दि 20 ला स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि गावातील कलावंतांना घेऊन नाट्य आयोजित करण्यात आले होते अश्याप्रकारे मोठया उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

error: Content is protected !!