Home सामाजिक नंदोरीत 19 फेब्रुवारीला होणार भव्य शिवजयंती उत्सव

नंदोरीत 19 फेब्रुवारीला होणार भव्य शिवजयंती उत्सव

1119

विविध कार्यक्रमाचे आयोजन

भद्रावती : श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान नंदोरीच्या वतीने 19 फेब्रुवारीला नंदोरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती होणार असून 17, 18 व 19 फेब्रुवारी या दरम्यान विविध स्पर्धेचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

.       सोमवार दि. 17 ला सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चंदू वासाडे उपस्थित राहणार आहे तर अध्यक्षस्थानी चंद्रपुर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, शिवसेना ब्रम्हपुरी चिमुर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, सोनाई इन्फ्रास्ट्रचऱ प्रा. ली. युवा प्रतिष्ठाण, नंदोरी (बु.) चे अध्यक्ष भानुदास ढवस उपस्थित राहणार आहे.

.       मंगळवार दि. 18 ला सायंकाळी 6 वाजता समाजभूषण ह.भ.प. चैतन्य महाराज राऊत यांचे भव्य किर्तन होणार असून त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राष्ट्रीय ओ.बी.सी. आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, शिवसेनेचे मुकेश जिवतोडे, राष्ट्रवादी काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती चे सदस्य विलास नेरकर, पंचायत समिती भद्रावती चे माजी सभापती प्रविण ठेंगणे, शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपुर चे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे उपस्थित राहणार आहे.

.      बुधवार दि. 19 ला सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य शोभायात्रेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पंचायत समिती भद्रावती चे माजी सभापती प्रविण ठेंगणे, माजी उपसरपंच तथा युवा प्रतिष्ठाण, नंदोरी (बु.) चे अध्यक्ष भानुदास ढवस, ग्राम पंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, दैनिक नवजीवन चे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, ग्राम पंचायत नंदोरी च्या उपसरपंच उषा सु. लांबट, ग्राम पंचायत नंदोरी चे माजी सरपंच तथा सदस्य शरद खामनकर, ग्राम पंचायत नंदोरी चे सदस्य किशोर उमरे, अजित पुसनाके, कविता हंसकार, जयश्री एकरे, संगिता एकरे, शारदा जिवतोडे, तंटामुक्त समिती नंदोरी चे अध्यक्ष आशीतोष घाटे व छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी व गावाकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

 १७ फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, 18 फेब्रुवारीला सायंकाळी 5 ते 7 आजी माजी सैनिकांचा सत्कार, सायंकाळी 8 वाजता समाजभूषण ह.भ.प. चैतन्य महाराज राऊत यांचे भव्य किर्तन, १९ फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता भव्य रक्ततान शिबीर, सायंकाळी. ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य शोभायात्रा, रात्री 9 वाजता बक्षीस वितरण होणार आहे. या तीन दिवसीय स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान तथा समस्त ग्रामवासी नंदोरी बु च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!