Home शैक्षणिक एनएमएमएस परीक्षेत गडबोरीतील तीन विद्यार्थी उत्तीर्ण

एनएमएमएस परीक्षेत गडबोरीतील तीन विद्यार्थी उत्तीर्ण

1093

सुशिक्षित बेरोजगार तरुणाने गुरुदेव मंदिरात घेतला होता विद्यार्थ्यांचा वर्ग

सिंदेवाही : गावातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम गडबोरी येथील सुशिक्षित बेरोजगार युवक आकाश माकोडे या तरुणाने मागील अनेक वर्षापासून काम सुरू केले असून नुकत्याच झालेल्या वर्ग ८ वीच्या एन.एम.एम.एस. या स्पर्धा परीक्षेत गावातील तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याने विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक म्हणून आकाश माकोडे या तरुणांचे गावातून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

.     गडबोरी येथील सर्वोदय विद्यालयातील वर्ग ८ मधील १३ विद्यार्थी एनएमएमएस या परीक्षेसाठी बसले होते. परंतु शाळेतील कोणतेही शिक्षक सदर विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन करताना दिसले नाही. त्यामुळे गावातील सुशिक्षित बेरोजगार आकाश माकोडे या तरुणाने गावातील गुरुदेव प्रार्थना मंदिर येथे परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची कोणताही मोबदला न घेता शिकवणी घेतली. अखेर स्वाती अशोक रणदिवे, कुणाल पुरुषोत्तम गायकवाड, प्राजक्ता अनिल गायकवाड, हे विद्यार्थी एन एम एम एस ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. गावातील सुशिक्षित बेरोजगार युवक आकाश माकोडे हा मागील अनेक वर्षापासून गावातील गरीब आणि होतकरू विद्यार्थांना शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय, यासारख्या स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे. गावातील तीन विद्यार्थी सदर परीक्षेत उत्तीर्ण झाले असल्याने विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक म्हणून आकाश माकोडे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!